अतुल जगताप
सातारा : प.पू.स्वामी गगनगिरी महाराज योगाश्रम आरळे जि.सातारा येथून पायी दिंडी सोहळ्याचे हे २२ वर्ष असून योगाश्रम आरळे ते गगनगिरी महाराज आश्रम खोपोली पर्यंत पायी दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन दरवर्षी करण्यात येत असते. रथामध्ये प.पू.स्वामी गगनगिरी महाराजांच्या चांदीच्या पादूका आणि प्रतिमा घेवून पायी दिंडी खोपोली आश्रमी जात असते. यावेळी दि. १० ऑगस्ट २०२२ पासून योगाश्रम आरळे येथून पायी दिंडीचे प्रस्थान होणार आहे.
आज बुधवार दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी आरळे ते उडतारे येथील जि.प.शाळेमध्ये दिंडीचा मुक्काम आाहे. त्यानंतर गुरुवार दि. ११ रोजी उडतारे, भुईंज मार्गे सुरुर येथील हायस्कूल येथे दिंडी सोहळा विसावणार आहे. पुढे शुक्रवार दि. १२ रोजी शिरवळ येथील कै.तुकाराम कबुले सभागृह येथे सकाळी दिंडीचे आगमन व दुपारी कापूरहोळ येथील श्रद्धा हॉटेल येथे दुपारची विश्रांती घेवून रात्रीचा मुक्काम खेडशिवापूर येथील शिवराय मंगल कार्यालयात होणार आहे.
रविवार दि. १४ ऑगस्ट रोजी दुपारी आंबेगांव मंदिर येथून रात्रीच्या मुक्कामासाठी सुतारवाडी येथील महादेव मंदिराकडे प्रस्थान करणार आहे. सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी गगनगिरी महाराज आश्रम पुणावळे येथून रात्रीच्या मुक्कामासाठी सोमाटणे फाटा येथील पार्वती मंगल कर्यालय येथे मुक्काम. मंगळवार दि. १६ रोजी दुपारी भेगडेवस्ती वडगांव मावळ येथून रात्रीच्या मुक्कामासाठी कामशेत येथील शिवशंकर गार्डन येथे रात्रीचा मुक्काम.
बुधवार दि. १७ रोजी वाकसई येथे तुकाराम पादुका मंदिर येथे दुपारचा व रात्रीचा मुक्काम राहणार असून पायी दिंडी सोहळा गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी वाकसई येथून दुपारी खंडाळा पुल, मेगाहायवे मार्गे रात्री प.पू.स्वामी गगनगिरी महाराज योगाश्रम खोपोली येथे पायी दिंडी सोहळा पोहोचणार आहे.
यंदाचे हे २२ वे वर्ष असून मध्यंतरी दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे हा पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आला होता. परंतु यंदा हा पायी दिंडी सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात होणार असल्याचे प.पू.स्वामी गगनगिरी महाराज योगाश्रम, आरळे येथील व्यवस्थापकांनी, आयोजकांनी सांगितले आहे.
यावेळी आरळे गावातील व परिसरातील सर्व भाविक भक्त या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. कुणा भाविक भक्तांना अन्नदान किंवा कोणत्याही प्रकारची सेवा करायची असल्यास ९७६६१५१५९६ किंवा ९८५०६०९४४९, ७९७२१९९००८ तसेच ७६६६५५०८६५ या मोबाईल नंबरवर किंवा समक्ष प.पू.स्वामी गगनगिरी महाराज योगाश्रम आरळे येथे आपली सेवारुपी मदत द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.