संदीप टुले
Daund News : केडगाव (ता. दौंड) येथील परिसरात एक उजाड माळरान हा तरुणांच्या मदतीने हिरव्या झाडांनी बहरला आहे. तरुणांनी काही काळापासून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे एका डोंगराचे हरित भूमीत परिवर्तन झाले आहे.(Daund News)
आज रविवारी (ता.२) ५०० झाडे लावण्यात आली आहे.
धनंजय बापू मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. भविष्यामध्ये येथे भव्य दिव्य असे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान उभे करण्याचा या मंडळाचा मानस आहे.(Daund News) मागील वर्षीच्या झाडांचे योग्य नियोजन केल्यामुळे या वर्षीपण त्यात भर म्हणून आज रविवारी (ता.२) ५०० झाडे लावण्यात आली आहे. यामध्ये लिंब, चिंच, गुलमोहर, वड, पिंपळ, करंज, बांबू, रेन ट्री, सप्तपणीर्, निम, बोर, खैर, हेकळण, बारतोंडी या झाडांचे वृक्षारोपण केले आहे.(Daund News)
या नवीन लावलेल्या झाडांसाठी उद्योजक धनजय शेळके यांच्या कडून पाण्याचे नियोजन करण्यासाठी लागणारे पाईप देण्यात आले आहेत. तसेच या झाडांचे पुढील नियोजन हे केडगावचे ग्राम रोजगारसेवक विजय कुमार शेळके हे पाहत आहेत.(Daund News)
यावेळी दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप हंडाळ, माजी संचालक सचिन शेळके, केडगावचे सरपंच अजित शेलार, भीमा पाटसचे माजी संचालक किरण देशमुख, धोंडीबा शेळके, मनोज शेळके, शेखर मोरे, धनजय शेळके, दत्तात्रय शेळके, नवनाथ गायकवाड, विशाल शेळके, प्रशांत शेळके, संदीप शेळके, सूरज शेळके, कैलास मोरे, आशिष शेळके, महेश म्हेत्रे हे उपस्थित होते.(Daund News)