गणेश सुळ
Daund News : केडगाव : नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेत सागर जयवंत पवार या युवकाने यशस्वी कामगिरी केली असून, नुकतीच त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदावर नियुक्ती झाली आहे. सागर पवार हे मूळचे सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील सरपढोह या ग्रामीण भागातील आहेत. त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
सागर पवार यांचे वडील जयवंत पवार हे प्राथमिक शिक्षक असून, पुणे जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनीही आदर्श शिक्षक म्हणून जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. (Daund News) सागर यांनी आपल्या वडिलांचा आदर्श समोर ठेवून हे घवघवीत यश मिळवले. सागर यांनी बीई मेकॅनिकलची पदवी घेतली आहे.
उत्तम यश संपादन करत सागर यांनी आपल्या ग्रामीण भागातील युवकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. सागर यांच्या मूळ गावी सरपढोह येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथेही पेढे वाटण्यात आले. (Daund News) समाजातील सर्व घटकांकडून सागर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीनेही अभिनंदन
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीनेही सागर यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी राज्याध्यक्ष गौतम कांबळे, (Daund News) राज्य महासचिव विठ्ठल सावंत, राज्य सल्लागार दिगंबर काळे व सागर यांचे वडील आदर्श शिक्षक व काट्राईब शिक्षक महासंघाचे राज्य कोअर कमिटी सदस्य जयवंत पवार उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : चोर समजून वाटसरूनांच मारहाण; दौंड तालुक्यातील पारगाव येथील घटना