गणेश सुळ
Daund News : केडगाव : दौंड शहराचा वेगाने विकास व्हावा, या हेतूने स्वातंत्र्यसैनिक व दौंडचे माजी आमदार (कै.) जगन्नाथ पाटसकर यांनी १९९२ साली स्वतःच्या मालकीची साडेसात एकर जागा येथील उपजिल्हा रुग्णालय व एसटी स्थानकाच्या (डेपो) उभारणीसाठी राज्य सरकारला दिली होती. त्या बदल्यात पाटसकर यांना घर बांधून देणार, असे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु आजतागायत पाटसकर यांचे कुटुंबीय हक्काच्या घरापासून वंचित आहेत. पाटसकर कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दौंड येथील अखिल भारतीय मराठा महासंघाचे आंदोलन छेडले आहे.
सरकारच्या पोकळ आश्वासनाविरोधात पोकळ बांबू मोर्चा
पाटसकर यांच्या कुटुंबियांना हक्काच्या घरापासून सरकारने तब्बल ३१ वर्षे वंचित ठेवले आहे. यामुळे ‘कोणी घर देता का, घर’ असे म्हणण्याची वेळ त्यांच्या कुटुंबियांवर आली आहे. (Daund News ) सध्या पाटसकर कुटुंबियांची तिसरी पिढी दुसऱ्यांच्या जागेत भाड्याने राहत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवार (ता. २३) ऑगस्ट रोजी येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सरकारच्या पोकळ आश्वासनाविरोधात पोकळ बांबू मोर्चा आंदोलन करण्यात आले.
कै. पाटसकर यांच्या घरापासून मोर्चाला सुरुवात झाली. नवीन तहसील कार्यालय आवारामध्ये मोर्चाची सांगता करण्यात आली. या वेळी मराठा महासंघाच्या मागणीचे निवेदन तहसीलदार अरुण शेलार यांनी स्वीकारले. (Daund News ) मराठा महासंघाचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस गुलाबदादा गायकवाड, जिल्हाध्यक्ष पांडुरंग जगताप तसेच आप्पासाहेब पवार, नंदू जगताप, विक्रम पवार, संजय थोरात, दादासाहेब नांदखेले, शैलेंद्र पवार, शिवसेनेचे अनिल सोनवणे, आनंद पळसे, संतोष जगताप, मनसेचे सचिन कुलथे, संजय थोरात, आबा थोरात, अतुल आखाडे, दीपक गाढवे, स्वप्निल गोगरे व मराठा संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : एकेरीवाडीच्या उपसरपंचपदी गंगाराम टूले यांची निवड
Daund News : ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत हरी नरके यांना पाटस येथे पुरोगामी संघटनांकडून श्रद्धांजली!