पुणे : पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर करत असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी जात असतात. यामधे याच वारकऱ्यांची जो तो आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा प्रामाणिकपणे करत असतात अशीच काही प्रामाणिक सेवा गेली कित्येक वर्ष दौंड तालुका केमिस्ट संघटना चोफुला (केडगाव) येथे वारकऱ्यांची मोफत औषधे वाटप करीत सेवा बजावत असतात.
यामध्ये वारकऱ्यांना वारीमध्ये चालताना जखम झाली असेल, तर पट्टी केली जाते हात पाय सुजले असतील तसेच इतर काही व्याधी असतील तर या संदर्भात गोळ्या औषधे देत सेवा केली जाते तसेच काही वारकऱ्यांना हात पायांना वेदना होत असतील तर चालून चालून मुंग्या येत असतील तर हात पाय मसाज तेलाने चोळून वारकऱ्यांची सेवा केली जाते. कोणाला अशक्त पण असेल तर एनर्जी ड्रिक दिले जाते. यावेळी बोलतांना वारकऱ्यांनी सांगितले की चोफुला येथे मिळणारी सेवा खरंच खूप छान प्रकारे हे केमिस्ट बांधव करत असतात. आम्ही दर वर्षी येथे येऊन औषधे घेतो व चालून जर जास्त पाय दुःखत असतील तर येथे येऊन चोळून घेतो. यावेळी दौंड तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधव उपस्थित होते .
आम्ही दररोज तर रुग्ण सेवा करत असतोच पण वारीतील वारकऱ्यांची सेवा करताना खूप समाधान वाटते. सेवा मिळाल्यानंतर जे समाधान वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहतो त्यांचा फार आनंद होतो. माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी घालून दिलेला वसा आम्ही पुढे चालू ठेवला आहे.
रोहिदास राजपुरे (CAPD सदस्य)