उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दत्तात्रय गणपत बारवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंच संगिता शेलार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच अश्विनी योगेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली.
या निवडणुकीत दत्तात्रय बारवकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी चौधरी यांनी दत्तात्रय बारवकर यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली. ग्रामसेविका विजया भगत यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
यावेळी पॅनल प्रमुख राजेंद्र चौधरी, माजी सरपंच गणेश चौधरी, कल्याणी हगवणे, जितेंद्र चौधरी, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, प्रियंका गायकवाड, कृष्णा चौधरी, बापूसाहेब चौधरी, सुरेश हगवणे, पोपट चौधरी, उत्तम शेलार, नितीन हगवणे, नवनाथ गायकवाड, विजय चौधरी, योगेश चौधरी, किरण गुळूंजकर, गुलाब चौधरी, संजय कामठे, संजय चौधरी, किरण चौधरी, अमोल खेडेकर, नितीन गरुड, जालिंदर शिर्के व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
याबाबत बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच दत्तात्रय बारवकर म्हणाले, “श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनलच्या धोरणानुसार गावाच्या सर्वांगीण विकास कामासाठी सरपंच – ग्रामपंचायत सदस्य आम्ही सर्व जण प्रयत्न करु. तसेच येणाऱ्या भविष्यकाळात मला मिळालेल्या पदाचा विकासकामे करत असताना नागरिकांनी सहकार्य करावे .