Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथे सायबर फसवणुकीच्या ‘म्युल अकाउंट’चा पर्दाफाश; खातेदारासह टोळीविरोधात गुन्हा, 59 हजारांची ऑनलाइन फसवणूक उघड

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 19 July 2026, 13:55

लोणी काळभोर : ऑनलाइन गुंतवणूक, पार्ट-टाईम जॉब, डिजिटल अटक यांसारख्या आमिषांद्वारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीशी संबंधित ‘म्युल बँक अकाउंट’चा लोणी काळभोर पोलिसांच्या सायबर विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात संबंधित खातेदारासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फसवणुकीत वापरलेल्या बँक खात्यातून 59 हजार 500 रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल (NCRP) व गृह मंत्रालयाच्या पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये पुणे शहरातील एका Axis Bank खात्यात सायबर फसवणुकीची रक्कम जमा झाल्यानंतर ती विविध खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचे समोर आले.

तपासात संबंधित खाते ‘Nirnkar Interior Pro-Jacky’ या नावाने उघडण्यात आल्याचे आढळले. हे खाते लोणी काळभोर परिसरातील व्यक्तीच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. या खात्यात फसवणुकीची रक्कम जमा करून ती पुढे इतर खात्यांमध्ये वळविण्यात येत असल्याचे ‘मनी ट्रेल’च्या विश्लेषणातून स्पष्ट झाले.

 

सायबर तपासादरम्यान संबंधित खात्याविरोधात NCRP पोर्टलवर तक्रारी नोंद झालेल्या असल्याचेही उघड झाले. उपलब्ध माहितीनुसार, या खात्याच्या माध्यमातून 59 हजार 500 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असून, ही रक्कम सायबर गुन्हेगारांच्या आर्थिक साखळीत फिरविण्यात आल्याचा संशय आहे.

लोणी काळभोर पोलिसांच्या सायबर विभागाने खातेदाराने संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला आपल्या बँक खात्याचा वापर करण्यास परवानगी दिल्याचा ठपका ठेवत त्याच्यासह इतर साथीदारांविरोधात सरकारतर्फे कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या रॅकेटशी संबंधित इतर संशयितांचा शोधही पोलिसांकडून घेतला जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हनीमून मर्डर मिस्ट्रीत मोठा ट्विस्ट! पतीचा काटा काढणाऱ्या सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Thursday, 23 July 2026, 18:43

सहाय्यक अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक! महावितरण कार्यालयात खळबळ

Thursday, 23 July 2026, 18:05

एक चप्पल अन् माती घसरल्याच्या खुणा… नाणेघाटात पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

Thursday, 23 July 2026, 17:13
Krushi Nidhi

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! कर्जमाफीची पहिली यादी आली; ‘ही’ अट पूर्ण नसेल तर लाभ हुकणार

Thursday, 23 July 2026, 16:48

पुणेकरांच्या ट्रॅफिकचा कायमचा बंदोबस्त! शिवाजीनगरमध्ये ७३ कोटींच्या नव्या उड्डाणपुलाला मंजुरी; असा असणार मास्टरप्लॅन

Thursday, 23 July 2026, 16:47

शिरुरमध्ये NEET गैरव्यवहाराच्या निषेधार्थ मोर्चा; सोनम वांगचुक यांना पाठिंबा

Thursday, 23 July 2026, 16:12
Next Post

वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्यसेवेचा हात; निमगाव केतकीत औषधे व पाणीबॉटलचे वाटप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.