Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांच्या ट्रॅफिकचा कायमचा बंदोबस्त! शिवाजीनगरमध्ये ७३ कोटींच्या नव्या उड्डाणपुलाला मंजुरी; असा असणार मास्टरप्लॅन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 23 July 2026, 16:47

पुणे: पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत ७३.५२ कोटी रुपये खर्चून नवीन उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार असून, या प्रकल्पाला महापालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मध्यवर्ती पुण्यातील अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पांतर्गत साखर संकुल ते जुना पुणे–मुंबई महामार्ग असा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासोबतच वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत करण्यासाठी ग्रेड सेपरेटरही बांधला जाणार आहे. महापालिकेने हा प्रकल्प पुढील १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

सध्या कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, शिमला ऑफिस चौक, संचेती रुग्णालयाजवळील जंक्शन आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) परिसरात दररोज सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या कोंडीचा परिणाम आजूबाजूच्या रस्त्यांवरही होत असल्याने संपूर्ण मध्यवर्ती शहरातील वाहतुकीचा वेग मंदावतो. या समस्येचा सखोल अभ्यास केल्यानंतर महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाने उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याचा प्रस्ताव तयार केला.

 

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांना अनेक गर्दीच्या चौकांना वळसा घालून थेट इच्छित मार्गावर जाता येईल. त्यामुळे प्रमुख चौकांवरील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. तसेच जुना पुणे–मुंबई महामार्ग आणि गणेशखिंड रस्त्यादरम्यानची संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

प्रकल्पासाठी प्रितम एंटरप्राइझ या संस्थेची सल्लागार म्हणून १४ ऑगस्ट २०२५ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. स्थलाकृतिक आणि भूतांत्रिक सर्वेक्षण तसेच वाहतुकीचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर सल्लागाराने उड्डाणपुलाचा आराखडा, सविस्तर प्रकल्प अहवाल, अंदाजपत्रक आणि तांत्रिक कागदपत्रे महापालिकेकडे सादर केली. या प्रकल्पाला २० नोव्हेंबर २०२५ रोजी तांत्रिक मंजुरी मिळाली, तर १९ जानेवारी २०२६ रोजी महापालिका आयुक्तांनी निविदा प्रक्रिया सुरू करण्यास हिरवा कंदील दिला.

महापालिकेच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी केवळ २.६ कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून प्रारंभिक कामे हाती घेतली जाणार असून, उर्वरित निधी पुढील आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पातून टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे. बांधकामाच्या काळात विद्यमान वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल, यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असून वाहनचालकांना अडचण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजनाही राबविण्यात येणार आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सहाय्यक अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक! महावितरण कार्यालयात खळबळ

Thursday, 23 July 2026, 18:05

एक चप्पल अन् माती घसरल्याच्या खुणा… नाणेघाटात पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

Thursday, 23 July 2026, 17:13
Krushi Nidhi

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! कर्जमाफीची पहिली यादी आली; ‘ही’ अट पूर्ण नसेल तर लाभ हुकणार

Thursday, 23 July 2026, 16:48

पुणेकरांच्या ट्रॅफिकचा कायमचा बंदोबस्त! शिवाजीनगरमध्ये ७३ कोटींच्या नव्या उड्डाणपुलाला मंजुरी; असा असणार मास्टरप्लॅन

Thursday, 23 July 2026, 16:47

शिरुरमध्ये NEET गैरव्यवहाराच्या निषेधार्थ मोर्चा; सोनम वांगचुक यांना पाठिंबा

Thursday, 23 July 2026, 16:12

रात्रीच्या जेवणात मासे खाणं पडलं महागात! गळ्यात काटा अडकला, संसर्ग होऊन अन्न गिळायला त्रास अन्…

Thursday, 23 July 2026, 16:03
Next Post
Krushi Nidhi

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! कर्जमाफीची पहिली यादी आली; 'ही' अट पूर्ण नसेल तर लाभ हुकणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.