Curry Leaves : कढीपत्ता हा अत्यंत आरोग्यास फायदेशीर आहे, आपण आहारात त्याचा आवर्जून समावेश करतो. त्याशिवाय कढीपत्ता हा केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर व लाभदायक आहे.
मुंबईच्या हेल्दी हायच्या प्रमुख न्युट्रिशनिस्ट भक्ती कपूर यांनी कढीपत्त्याचे अनेक गुणकारी फायदे सांगितले आहेत.
कढीपत्त्याचे अनेक गुणकारी फायदे :-
उत्तम आहार घेणे आपल्या निरोगी शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे. आहारात नेहमी पौष्टिक घटकांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आपण आहारातील एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाविषयी जाणून घेणार आहोत. कढीपत्ता हा अत्यंत आरोग्यास फायदेशीर असून, आपण आहारात त्याचा आवर्जून समावेश केला पाहिजे. तसेच कढीपत्ता केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही खूप लाभदायक आहे. मुंबईच्या हेल्दी हायच्या प्रमुख न्युट्रिशनिस्ट भक्ती कपूर यांनी कढीपत्त्याचे अनेक गुणकारी फायदे सांगितले आहेत.
भक्ती कपूर सांगतात कि, “कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात; जे शरीरातील पेशींना खराब होण्यापासून वाचवतात. कढीपत्त्यामुळे अल्सरचा धोका कमी होतो. आतड्यांचे आरोग्य चांगले राहते; ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. काही अभ्यासांतून असेही समोर आले आहे की, कढीपत्ता हा शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. त्याशिवाय कढीपत्त्यामुळे कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होते. कढीपत्त्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण अधिक असल्यामुळे आपली त्वचा आणि केस निरोगी राहण्यास मदत होते.”