सोलापुर: सोलापुरातून एक अत्यंत धक्कादायक (Crime News) आणि संतापजनक घटना समोर आली असून, लग्नाचे आमिष दाखवून एका ११ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर (Solapur News) अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर पोलिसांनी या प्रकरणी विकी बजरंग मनसावाले नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अवघ्या १६ वर्षांची असून ती ११ वीत शिक्षण घेत आहे. आरोपी विकी मनसावाले याने या मुलीच्या एका मैत्रिणीचा आधार घेऊन तिच्याशी संपर्क वाढवला होता. “तू मला खूप आवडतेस, मी तुला जन्मभर साथ देईन आणि तुझ्याशीच लग्न करेन,” अशा गोड शब्दांत त्याने या अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. कोवळ्या वयातील या मुलीने त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि त्यांच्यात जवळीक वाढली.
आरोपीने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन पीडितेचे शारीरिक शोषण करण्यास सुरुवात केली. ऑगस्ट २०२५ मध्ये त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर काही दिवस हे प्रकार सुरूच होते. मात्र, आपले ईप्सित साध्य झाल्यानंतर आरोपीच्या वागण्यात अचानक बदल झाला.

काही काळानंतर आरोपीने पीडित मुलीशी बोलणे टाळण्यास सुरुवात केली. जेव्हा मुलीने लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला आणि तिला सोडून दिले. आपला विश्वासघात झाल्याचे लक्षात येताच पीडित मुलीने आपल्या कुटुंबाला हा प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीने हिंमत दाखवून पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली.







