IPL 2023 | पुणे : इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या ३१ व्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर १३ धावांनी पराभव केला. पंजाब किंग्जने ठेवलेल्या २१५ धावांचे आव्हान पार करताना मुंबईने शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. मात्र सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन, रोहित शर्मा आणि टीम डेव्हिड यांचे प्रयत्न अखेर धावांनी अपुरे ठरले.
पंजाबकडून अर्शदीप सिंगने स्टम्पतोड गोलंदाजी करत ४ षटकात ४ विकेट्स घेतल्या. मुंबईला विजयासाठी शेवटच्या षटकात १६ धावा हव्या होत्या. पण, अर्शदीपने सलग दोन चेंडूत दोन विकेट घेत पंजाबला सामना जिंकवून दिला. अर्शदीपची पहिली विकेट इतकी शानदार होती की त्याने थेट स्टंप फोडले. चेंडू थेट मधल्या स्टंपला लागला आणि स्टंप मध्येच तुटला.
दरम्यान, यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने नेहल वधेरालाही त्याच पद्धतीने बाद केले आणि पुन्हा एकदा स्टंप मध्येच तुटला. दोन चेंडूंवर बीसीसीआयला ३० लाख रुपये मोजावे लागले. मुंबईसाठी फलंदाजी करत असलेले टिळक वर्माने जेव्हा हे पाहिलं तेव्हा काही काळासाठी तो चकित झाला होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Sports News | खराडी गावात रंगणार कुस्त्यांचा आखाडा
Passport : पुणेकरांचा त्रास वाचणार ; पासपोर्टसाठी दैनंदिन अपॉइंटमेंटमध्ये वाढ