Cow Baby Shower : कोल्हापूर : पाळीव प्राण्यांवर जीव ओवाळून टाकणारी मंडळी अनेक असतात. प्राण्यांवरील प्रेमापोटी कोणी त्यांचे वाढदिवस साजरे करतात, तर कोणी त्यांना छान-छान कपडे शिवून घालतात. पण कोल्हापुरातील हुपरी शहरात सध्या भलतच घडलंय. गायीच्या डोहाळे जेवणाची वेगळीच चर्चा रंगलीय. हुपरी येथे राहणारे किसन माने या शेतकऱ्याने गायीवरील प्रेमापोटी चक्क डोहाळे जेवणाचा आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम केला आहे.(Cow Baby Shower)
गायीच्या डोहाळे जेवणाची वेगळीच चर्चा रंगलीय.
शेतकरी जनावरांना घरातील एका सदस्याप्रमाणे वाढवतात. जनावराशी नातं इतकं घट्ट असतं की तो त्याच्या प्रत्येक सुख-दु:खातही सहभागी होतो. कोल्हापूरच्या किसन माने या शेतकऱ्यानं त्याच्या लाडक्या गायीच्या डोहाळे जेवणाचा खास कार्यक्रम केला. ते कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील असणाऱ्या हुपरी गावात राहतात. त्यांची वडीलोपार्जित शेती आहे. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना जनावरांच्याबद्दल प्रेम आणि जिव्हाळा आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या गायींपैकीच एक गाय म्हणजे गौरी. तिच्या डोहाळे जेवण आणि ओटी भरण्याचा मोठा कार्यक्रम नुकताच गावात पार पडला.(Cow Baby Shower)
गौरी अगदी १५ दिवसांची असताना माने यांनी तिला घरी आणले. अगदी लहान बाळाप्रमाणे तिचे संगोपन केले. अगदी गौरीला बाटलीमधून दूध पाजले. दिवसेंदिवस गोरीशी माने कुटुंबीयांची नाळ जुळत गेली.(Cow Baby Shower) संपूर्ण माने कुटुंबीयांना गौरीचा लळा लागलाय. त्यामुळे तिच्या बाळंतणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं.
सध्या गौरीचे वय तीन वर्ष असून, ती नऊ महिन्यांची गाभण आहे. घरातील सदस्यासारखं गौरीचे डोहाळे जेवण करण्यात आले होते. आपल्या घरच्या मुलीचेच डोहाळे जेवण समजून माने यांनी सर्व कार्यक्रम केला. या कार्यक्रमासाठी आपले नातेवाईक, मित्रमंडळी आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्वांना त्यांनी आमंत्रण दिले होते. हिंदू धर्मात गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे गायीच्या डोहाळे जेवण कार्यक्रमाला महिला वर्ग मोठ्या उत्साहानं सहभागी झाला होता.(Cow Baby Shower)
महिलांनी गौरीला ओवाळून तिचे औक्षण करत ओटी भरली. यावेळी गौरीला अंघोळ घालून सुंदररित्या सजवण्यात आले होते. दारात रांगोळीही काढण्यात आली होती. माने कुटुंबियांनी उपस्थितांना स्नेह भोजनाची देखील व्यवस्था केली होती.
गायीची ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते. तर अनेक जण या कार्यक्रमाचे आणि माने कुटुंबीयांचे कौतुक करत होते. पंचक्रोशीतील शेकडो महिला आणि पुरुषांनी हा अनोखा गायीच्या डोहाळे जेवण आणि ओटी भरण्याच्या कार्यक्रम अनुभवला. त्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा आणि माने कुटुंबीयांचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.(Cow Baby Shower)