यवत : यवत ग्रामपंचायत कार्यालय येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व संविधान उद्देशिका पुष्पहार अर्पण करण्यात आले. विद्या विकास मंदिर हायस्कूलचे विद्यार्थी व जमलेल्या नागरिकांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून प्रतिज्ञा घेण्यात आली.
भारतीय राज्यघटना संविधानदिनाच्या निमित्ताने अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा व उपस्थितीबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी यवत ग्रामपंचायत सरपंच समीर दोरगे, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा प्रमुख अधिकारी स्नेहल माने, सेवा निवृत्त पोलिस अधिकारी बबनराव गायकवाड, विद्या विकास मंदिर मुख्याध्यापक दादा मासाळ, शिक्षक सतीश सावंत, युवा नेते गणेश शेळके, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अनिल गायकवाड, बापु जगताप, शैलेश जैन ,विनोद जगताप, शैलेश नेटके, मंगेश सणस, बँकेचे दीपक नेटके , सामाजिक कार्यकर्ते,ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला बचत गटातील प्रमुख महिलावर्ग प्रामुख्याने उपस्थित होते,