Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना कर्मयोगी कारखान्या संदर्भातील कोणतीही न्यायालयीन नोटीस प्राप्त नाही : कार्यकारी संचालक लोकरे

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 27 November 2022, 15:22

दीपक खिलारे

इंदापूर : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातील दाव्यामध्ये न्यायालयाने काढलेली कोणतीही नोटीस कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पद्माताई भोसले यांना प्राप्त झालेली नाही. तरीही काही स्थानिक वृत्तपत्र व टिव्ही चॅनलवर अपूर्ण माहितीच्या आधारे चुकीचे व बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध करणेत आलेले आहे, अशी माहिती कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी रविवारी (ता.२७) दिली.

ते पुढे म्हणाले की, सदर प्रकरणी संबंधितांनी अवाजवी व्याज आकारल्याने कारखान्याने न्यायालयात त्या विरोधात दाद मागितली आहे. मात्र सदर प्रकरणी यापूर्वीच तडजोड झाली असून, दि.२ डिसेंबर रोजी न्यायालयात झालेल्या तडजोडीवर अंतिम निर्णय होईल.

 

न्यायालयामध्ये दावा दाखल केलेल्या संबंधित पार्टीशी कारखान्याचा साखरे संदर्भात व्यवहार झाला होता. सदर व्यवहारापोटी कारखान्याने वेळोवेळी काही रक्कमा संबंधित पार्टीस अदा केलेल्या आहेत. मात्र मध्यंतरी पडलेल्या दुष्काळामुळे व्यवहारात अडचणी निर्माण झाल्या. कर्मयोगी कारखाना हा सुमारे २५ हजार शेतकरी सभासदांच्या मालकीचा आहे, त्यामुळे न्यायालयात कारखान्याने शेतकरी सभासदांच्या हिताची भूमिका घेतली.

संबंधित पार्टीने आवाजवी व्याज आकारल्याने कारखान्याने त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. साखर उद्योगांमध्ये न्यायालयामध्ये अशा प्रकारचे दावे असणे हा नियमित कामकाजाचा भाग समजला जातो. सध्याही राज्यातील विविध कारखान्याच्या संदर्भात असे शेकडो दावे न्यायालयात चालु आहेत. कारखान्यांशी संबंधित बहुतांशी दावे हे तडजोडीने निकाली निघत असतात. त्यानुसार कर्मयोगी कारखान्याच्या संबंधित दाव्यामध्ये मध्यल्या काळात संबंधित पार्टी बरोबर तडजोड झाली असून, दि.२ डिसेंबर रोजी न्यायालयातील सदर प्रकरणी तडजोडीवर अंतिम निर्णय होईल,असे लोकरे यांनी नमूद केले.

हर्षवर्धन पाटील साहेब तसेच पद्माताई भोसले यांना अशा प्रकारची कोणतीही न्यायालयीन नोटीस प्राप्त नसताना त्यांची तसेच कारखान्याची नाहक बदनामी झाली असून, यासंदर्भात बदनामीकारक वृत्त दिल्याने संबंधित वृत्तपत्र, चॅनल व बातमीदारांविरोधात वकिलांचा सल्ला घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचा व अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयामध्ये दाखल करणार असल्याचेही कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

पिंपरी चिंचवड हद्दीत जुना मुंबई-पुणे महामार्ग राहणार बंद ; बीआरटी मार्गही नव्याने सुरु होणार..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.