अजित जगताप
सातारा : सम्राट अशोका विजयादशमी आणि बोधीसत्व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात मोठ्या महाधम्मक्रांतीच्या ६६ वा धम्मचक्क प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने वडूज ता खटाव जि सातारा या ठिकाणी सामुदायिक बुद्ध, धम्म, संघ वंदना घेण्यात आली.
या वेळी भगवान बुद्ध तत्वज्ञानाचे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२प्रतिज्ञाचे पालन करणाऱ्या बौद्ध धम्म बांधवांना विविध जाती धर्माच्या लोकांनी मंगलमय सदिच्छा दिल्या. तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका सौ राजेश्री म्हस्के, उत्तम म्हस्के यांनी प्रा.आर के गायकवाड, सौ मायावती गायकवाड यांना भगवान बुद्ध यांची मूर्ती दिली. तसेच शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ कल्पना जगताप, अजित जगताप,कुमारी अस्मिता, कुमारी अनुष्का गायकवाड उपस्थित होते.
खटाव तालुक्यातील विविध गावातील सार्वजनिक बुद्ध विहार, समाज मंदिर तसेच घरात बुद्धीस्ट लोकांनी भगवान बुद्ध, छत्रपती शिवराय, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले.महामानवांनी मानवतेच्या कल्याणासाठी शस्त्र खाली ठेवून मानवतेची शिकवण दिली आहे. वैर जिंकावे प्रेमाने,, युद्धाने वाढते युध्द,,नको युध्द आता हवा बुद्ध,, असा जगभर बुद्धांच्या संदेशाचा प्रसार व प्रचार होत आहे. अनेक धार्मिक संघटना बुद्ध तत्वज्ञान लोकांच्या मध्ये रुजवत आहेत. याची प्रचिती संपूर्ण भारतात दिसून येत आहे. ‘जो मनाने शुद्ध तो झाला बुद्ध’ अशा सोप्या भाषेत बुद्ध सांगितला जात आहे.
कुमठे, कुरोली, गोपूज, गोरेगाव वांगी, बुध, डिस्कळ, निढळ,पुसेसावळी,औंध,गुरसाळे, खटाव, मायणी, चितळी, काण्हेरवाडी, यलमरवाडी,निमसोड, कलेढोण, पुसेगाव,विसापूर, वडी,कळंबी, नांदोशी,वर्धनगड मोळ आदी गावातील लोकांनी ही धम्म चक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करून एकमेकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या बौद्ध धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी शैलेश वाघमारे, सौ ऋतुजा गडांकुश, बबन जगताप, अशोक बैले,विश्वास जगताप, सुधाकर शिलवंत,अजित कंठे, संतोष वाघमारे, शिवाजी रणदिवे,श्री डावरे, महादेव बनसोडे,प्रकाश झेंडे,डॉ मीना इंजे, गौतम खरात,संतोष भंडारे,दिपक जावळे, विजय कांबळे, सुरेश खराटे व बौद्ध धम्म बांधवांनी परिश्रम घेतले.