पुणे : बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणाचा आज निकाल समोर आला. पनवेल सत्र न्यायालयाने सहाय्यक पोलीस अधिकारी अश्विनी बेंद्रे हत्याप्रकरणात मुख्य आरोपी अभय कुरंदरकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर सहआरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी या दोघांनादेखील सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र या दोघांची काही दिवसातच सुटका होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी बेंद्रे हत्याकांड प्रकरणातील सहआरोपी कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर यांना सात वर्षाची शिक्षा सुनावली आहे. मात्र शिक्षेचा हा कालावधी या दोघांनी आधीच पूर्ण केला आहे. मागील काही वर्षापासून हे दोघेही तुरुंगात आहेत. त्यामुळे हे दोघेही काही दिवसात तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.
2016 मध्ये अश्विनी बेंद्रे यांची हत्या करण्यात आली होती. अभय अभय कुरंदरकरने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या अश्विनी बिंद्रे हत्याकांडाचा निकाल 9 वर्षानंतर लागला आहे.