Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील CNG संकट अधिकच गहिरे; MNGL च्या दिरंगाईविरोधात आता थेट केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडे धाव

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 6 August 2026, 16:38

पुणे : पुणे शहर आणि परिसरातील सीएनजीचा कमी दाब व अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे निर्माण झालेले गंभीर संकट अद्याप कायम असून, या प्रश्नावर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) कडून कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने पुणे पेट्रोल डीझेल असोसिएशनने Petrol Dealers Association Pune (PDAP) आता थेट केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

एमएनगीएलकडे वारंवार लेखी निवेदने, प्रत्यक्ष बैठका आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) यांच्याकडेही पाठपुरावा करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. उलट, अलीकडेच PDAP ने MNGL ला निश्चित कालमर्यादेसह कृती आराखडा सादर करण्याची मागणी करणारे सविस्तर निवेदन दिले होते. मात्र, त्यालाही अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सध्या कमी गॅस दाबामुळे पुण्यातील अनेक CNG पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. हजारो वाहनचालकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून, पंपचालकांना आर्थिक फटका बसत आहे. ग्राहकांचा रोष सहन करावा लागत असतानाच काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याच्या कारणावरून वाहतूक पोलिसांकडून CNG पंपचालकांना नोटिसाही बजावण्यात आल्याने डीलर्समध्ये तीव्र नाराजी आहे.

याशिवाय, विद्यमान CNG केंद्रांवरील ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित DBS (Daughter Booster Station) फीडिंग व्यवस्था किंवा इतर पर्यायी उपाययोजनांबाबत MNGL कडून कोणतीही स्पष्ट भूमिका किंवा अंमलबजावणीचा कालावधी जाहीर करण्यात आलेला नसल्याने प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

 

या पार्श्वभूमीवर PDAP ने केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची तातडीने भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. गॅसचा दाब पूर्ववत करणे, आवश्यक पायाभूत सुविधा युद्धपातळीवर उभारणे, अंतरिम पुरवठा व्यवस्था सुरू करणे आणि MNGL च्या त्रुटींमुळे CNG पंपचालकांवर होणारी अन्यायकारक कारवाई थांबविण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी संघटनेची मागणी आहे.

पुणे पेट्रोल डीझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल म्हणाले, “पुण्यातील लाखो नागरिकांना दररोज केवळ CNG भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे, ही अत्यंत गंभीर आणि अस्वीकार्य परिस्थिती आहे. गॅस पुरवठ्यावर आमचे कोणतेही नियंत्रण नसतानाही पंपचालकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीची जबाबदारीही आमच्यावर टाकली जात आहे. MNGL आणि संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप करून पुणेकरांना तातडीने दिलासा द्यावा.”

दरम्यान, सतत वाढत चाललेल्या या संकटामुळे पुण्यातील CNG व्यवस्था कोलमडण्याच्या उंबरठ्यावर असून, आता केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतरच या प्रश्नावर तोडगा निघणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58

‘ओल्ड मंक’ प्रेमींचा पुन्हा हिरमोड होणार? बंदी हटवण्याबाबत हालचाली; न्यायालयातून मोठी अपडेट

Wednesday, 2 September 2026, 19:16

पुणेकरांसाठी महागुड न्यूज! बाह्य रिंगरोडच्या पश्चिम टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण; डिसेंबरपर्यंत ६५ टक्के काम करण्याचे मोठे लक्ष्य

Wednesday, 2 September 2026, 18:33

Big Breaking: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक! बावनकुळेंच्या फोननंतर लक्ष्मण हाकेंचा निर्णय, मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन..

Wednesday, 2 September 2026, 17:55

राम मंदिराला मिळाले पहिले CEO! 38 वर्षे हवाई दलात सेवा केलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

Wednesday, 2 September 2026, 17:55
Next Post

हवेलीतील एका बड्या व्यावसायिकावर रात्रीच्या वेळेस गोळीबार ; रोकड व 20 तोळे सोन्याचे दागिने लुटून हल्लेखोर पसार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp