पुणे : राज्यातील तापमानात वेगाने वाढ झाल्याने उन्हाच्या झळांची तीव्रता वाढू लागली असतानाच आता राज्यातील काही भागात कालपासून ढगाळ हवामान दिसत आहे. आज सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर येथील राज्यातील उच्चांकी 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
आज दक्षिण कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा आहे तर उर्वरित राज्यात उष्णतेचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच उद्या राज्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता ही वर्तवली जात आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसानंतर पावसाचा अंदाज दिला आहे.
मार्च महिन्यात उष्णतेच्या झळा अधिक तीव्र होताना दिसत आहेत. हवामान सध्या उष्ण आणि दमट असल्याचे बघायला मिळत आहे. मुंबई,पुणे,नागपूर, मराठवाडा,विदर्भ या ठिकाणी ऊन अधिक वाढताना दिसत आहे. यलो अलर्ट ही हवामान खात्याकडून या ठिकाणी देण्यात आला आहे.