भोर / जीवन सोनवणे : वैयक्तिक स्वच्छतेसह सार्वजनिक स्वच्छता राखणे, हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. स्वच्छतेची लोकचळवळ निर्माण करण्यासाठी देशात ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत असून, ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत देशात सर्वत्र १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये १ ऑक्टोंबर रोजी किमान १ तास स्वच्छतेसाठी सर्वांनी देण्याचा उपक्रम सर्वत्र तालुक्यातील शहरासह सर्व ग्रामीण भागातून राबविण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील खेड शिवापूर टोल नाका येथे स्वच्छता मोहीम घेण्यात आली. टोल प्लाझाजवळील भागात स्वच्छता करत येणाऱ्या वाहनधारकांना स्वच्छता संदेश देत स्वच्छतेसंदर्भातील पत्रके देखील देण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे ओंकार जगदाळे, सौरभ गांधी, इंजिनीअर योगेश अप्पा साई, किरण खेड, शिवापूर टोल प्लाझाचे अधिकारी, अमित भाटिया, अनिल सिंह, बद्री प्रसाद शर्मा, अभिजीत गायकवाड, संदीप कोंडे राकेश कोळी, सचिन जैन, वैभव पाटील, प्रमोद खडालकर, ऋतिक शिंदे आदी उपस्थित होते.