Maharashtra Board Exams 2024 : पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्ड परिक्षांचे वेळापत्रक आज जाहीर केलं. फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणार्या दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा 1 मार्चला सुरू होईल ती 26 मार्चला संपेल. तर, बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या काळात पार पडेल. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज (दि. 2) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 ते 29 फेब्रुवारीदरम्यान, तर बारावीची परीक्षा 2 ते 20 फेब्रुवारीदरम्यान घेतली जाणार आहे. महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२वी) व्यवसाय अभ्यासक्रम- बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार, दि. १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होतील.
- माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाई परीक्षा (१२वी) – बुधवार, दि. २० मार्च ते शनिवार, दि. २३ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होईल.
- माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) – शुक्रवार, दि. १ मार्च २०२४ ते मंगळवारी, दि. २६ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होणार आहे.
तसेच दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ ते गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत होईल. १२ वीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दि. २ फेब्रुवारी ते मंगळवार दि. २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सविस्तर वेळापत्रक येथे पाहता येणार www.mahasscboard.in