Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MLA Prakash Solanke : जीवे मारण्याच्या हेतूनेच पेट्रोल बॉम्ब, शस्त्रसासह घरावर हल्ला; प्रकाश सोळंकेंचा खळबळजनक दावा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 2 November 2023, 15:52
MLA prakash solanke press conference about attack on his house in majhalgaon in beed

मुंबई : माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी घराची जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड झाल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली होती. तसेच, सोळंके यांच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही पेटवल्या होत्या. याबाबत प्रकाश सोळंके यांनी त्या दिवशी नेमकं काय काय घडलं हे मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर सांगितलं.

“या जमावामध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त इतर जाती जमातीचे लोक होते. यासोबतच काळाबाजार करणारे अनेक लोक देखील सहभागी होते. जे माझे 30 वर्षांपासूनचे राजकीय विरोधक आहेत. याबरोबर त्यांच्या संस्थेत काम करणारे शिक्षक देखील होते. जे 300 जण आले होते ते पूर्ण तयारीने आले होते. त्यांच्याकडे शस्त्र होते. मोठ्या दगडांसोबत पेट्रोल बॉम्ब देखील होते. हे सर्वजण संपूर्ण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते”, असा खळबळजनक दावा आमदार प्रकाश सोळंके यांनी केला.

आमदार प्रकाश सोळंके नेमकं काय म्हणाले?

राज्यात 2 महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा विषय सूरू आहे. ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. त्यातच बीड जिल्ह्यात वातावरण गंभीर आहे. 2011 पासून मनोज जरांगे पाटील हे आरक्षण या विषयावर काम करत आहेत. संपूर्ण मराठा समाज हा त्यांच्या नेतृत्वात एकवटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं यासाठी समाजातील सर्वजण प्रयत्नशील आहेत. मी या आंदोलनात मागील 2 महिन्यांपासून सहभागी आहे. मी बीडमधील माजलगाव मतदारसंघाचा आमदार आहे. आमदार होण्यापूर्वी पंचायत समिती सभापती जिल्हापरिषद सदस्य देखील होतो. तसेच माझे वडिल जिल्हा परीषद अध्यक्ष होतें. 1967 ते 80 ते राज्यमंत्री, मंत्री देखील होते. मी स्वतः राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. 1987 ते 2023 माझा 36 वर्षाचा अनुभव आहे.  माजलगाव मतदारसंघात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

 

30 ऑक्टोबरला मी घरातच होतो. त्यादिवशी माजलगाव बंद करण्यात आले होते. त्यावेळी 5 हजार तरुण जमा झाले होते. सकाळी साडे दहा वाजता काही तरुण आले आणि त्यांनी मला हा सर्व जमाव माझ्या घरावर येणारं आहे, अशी माहिती दिली. मी तरीही तिथेच थांबलो. मी त्यांच्याशी बोलता यावे म्हणून थांबलो. या जमावामध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त इतर जाती जमातीचे लोक होते. यासोबतच काळाबाजार करणारे अनेक लोक देखील सहभागी होते. जे माझे 30 वर्षांपासूनचे राजकीय विरोधक आहेत. याबरोबर त्यांच्या संस्थेत काम करणारे शिक्षक देखील होते. जे 300 जण आले होते ते पूर्ण तयारीने आले होते. त्यांच्याकडे शस्त्र होते. मोठ्या दगडांसोबत पेट्रोल बॉम्ब देखील होते. हे सर्वजण संपूर्ण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते.

सोळंके पुढे म्हणाले की, 300 लोकं हे अवैध धंदा करणारे, काळाबाजार करणारे आणि माझे विरोधक होते. मी पोलिसांना सर्व सीसीटीव्ही फुटेज दिले आहे. मी जिल्हा पोलिसांकडे मागणी केली आहे की केवळ दोषींवर कारवाई करा. सरसकट कारवाई नको. हल्ला करणारे हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे माहिती नाही. आत्ता पर्यंत एकूण 21 लोकांना अटक झाली आहे. त्याला सीसीटीव्ही फुटेजचा आधार आहेच. यामध्ये 8 आरोपी मराठा आंदोलकांनाव्यतिरिक्त आहेत. माझ्या ऑफिस आणि घराचं संपूर्णपणे नुकसान झाले असून मी याबाबत अजुनही तक्रार दिली नाही, असं देखील सोळंके म्हणाले.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Maharashtra Board Exams 2024 : ऑल द बेस्ट! दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.