अजित जगताप :
वडूज : छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले व सावित्रीबाई फुले अशा युगपुरुषांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह व्यक्तव्य केले होते. याचा जाहीर निषेध कारण्यासाठेही खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी ३ डिसेंबर रोजी रायगड येथे होणाऱ्या जननिर्धार मेळाव्यात खटाव तालुक्यातील पाच हजार मावळे सहभागी होणार असल्याचे वडूजचे माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरुव यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर हे आमचे दैवत असून त्यांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही उत्तर देणार आहोत. आम्हाला लोकशाही व मानवतावादी दृष्टिकोनाने रोखले असून आम्ही वैचारिक भूमिका मांडण्यासाठीच संयम राखत आहे.
छत्रपती उदयनराजे यांचा आक्रमक स्वभाव असून देखील त्यांच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूंची किंमत राज्यपाल व त्रिवेदी यांचे समर्थन करणाऱ्यांना भोगावीच लागणार असल्याचा इशारा गुरुव यांनी दिला.
यामुळे राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करताना या लढ्यात मावळे म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन गुरुव यांच्याकडून करण्यात आले आहे.
खटाव तालुक्यातील शिवप्रेमी व शिवसेना खटाव तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे, खटाव तालुका सरपंच संघटना अध्यक्ष विजय दादा शिंदे, नगरसेवक प्रतिक बडेकर, जनता क्रांती दलाचे अध्यक्ष सत्यवान कमाने, रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते कुणाल गडांकुश, मुस्लिम समाज कार्यकर्ते इम्रान बागवान,रिपाइंचे गणेश भोसले, अजित कंठे,बहुजन नायक दत्ता केंगारे,राजू फडतरे, वडुजचे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार,मोहंमद मुल्ला,पंकज मेहता,शाहिदा मुल्ला, सौ राणी काळे, तसेच निष्ठावंत शिवसैनिक बाळासाहेब जाधव, अजिंक्य वाघमारे,प्रशांत माळी,मराठा क्रांती मोर्चाचे विनोद शिंदे,वंचित बहुजन आघाडीचे तुषार बैले,विजय शेटे,परेश जाधव, आकाश गोडसे, पै जालिंदर गोडसे,आनंदा साठे, किशोर गोडसे, चैतन्य गोडसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.