मुंबई : मनोज जरांगे पाटील म्हणतात की, माझा कार्यक्रम केला जाणार, मला गोळी मारली जाऊ शकते असा खळबळजनक दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. त्यासाठी त्यांनी पोलिसांच्या रिपोर्टचा दाखलाही दिला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी भूमिका सर्वच पक्षांनी घेतली आहे. मग फक्त भुजबळच टार्गेट का होतोय, असा सवाल राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी केला. तसेच भुजबळ हा मराठा समाजाचा विरोधक आहे अशी प्रतिमा निर्माण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
छगन भुजबळ म्हणाले की, “मी आता त्याचा कार्यक्रम करतो असं मनोज जरांगे पाटील म्हणतात म्हणतात. म्हणजे माझा कार्यक्रम करणार. त्यानंतर अचानक माझी पोलिसांनी सुरक्षा वाढवली. मी कारण विचारलं असता त्यांनी वरून इनपूट आल्याचं सांगितलं. मला गोळी मारली जाऊ शकते, असा पोलिसांचा अहवाल आहे. त्यामुळे सुरक्षा वाढवली.” असंही भुजबळ म्हणाले.