पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील पूल शनिवारी (दि.1) मध्यरात्री 2 वाजता पाडला जाणार आहे. केवळ दहा सेकंदात हा पूल पाडला जाणार आहे. पुलाचा राडारोडा काढण्यासाठी या मार्गावरची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. शनिवारी (दि. 1) रात्री 11 पासून ते रविवारी (दि. 2) सकाळी 8 वाजेपर्यंत चांदणी चौकातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. येथील वाहतूक देखील वळवण्यात आली आहे.
मुंबईवरून बाणेर येथे आल्यानंतर विद्यापीठ चौक, संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक आणि स्वारगेटवरून सातारा रस्त्यावरून साताऱ्याकडे प्रवाशांना जाता येणार आहे. हा वाहतूक बदल नागरिकांनी लक्षात घेऊन त्या दृष्टीने प्रवास करावा असे आवाहन
“1 ऑक्टोबर रोजी रात्री 11 ते 2 ऑक्टोबर सकाळी 8 या कालावधीत चांदणी चौकातील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार आहे. यामुळे मुंबईकडून येणारी जड वाहने ही तळेगाव दाभाडे येथील टोल नाक्याच्या अलीकडे थांबवली जाणार आहे. तर साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक खेड-शिवापूर परिसरात थांबविली जाणार आहे,” असे पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले.
हलक्या वाहनांसाठी मुंबईकडून साताऱ्याकडे आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी तीन पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आल्याचे श्रीरामे यांनी सांगितले. पूल पडण्याच्या कालावधीत या मार्गाचा वापर प्रवासासाठी टाळावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्यांसाठी..
मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी हलकी वाहने जून्या पुणे-मुंबई टोल नका, सोमाटणे फाटा, देहू रोड, भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा, खडकी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) चौक, संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक (म़ॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडुजी बाबा चौक, टिळक चौक, स्वारगेट, सातारा रस्ता, कात्रज चौक मार्गे साताऱ्या जातील.मुंबईवरून वाकड येथे आल्यानंतर राजीव गांधी पूलावरून औंध, आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोरील चौक), संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, स्वारगेट, सातारा रस्त्यावरून ते सातारा येथे जातील.
हलक्या वाहनांसाठी 3 मार्ग..
वाहतूक पोलिसांनी केलेल्या बदलात हलक्या वाहनांसाठी 3 मार्ग ठेवले आहे. यातील एक म्हणजे साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना जुन्या बोगद्यामार्गे कात्रज-स्वारगेट-टिळक चौक-शिवाजीनगर-विद्यापीठ चौकातून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून थेट महामार्गावर मुंबईच्या दिशेने या वाहनांना जाता येणार आहे.
मुंबईकडे जाताना असे जा..
साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना दुसरा पर्यायी रस्ता हा नवले पूल, वडगाव पूल, सिंहगड रस्ता, राजाराम पूल, स्वर्गीय राजा मंत्री पथावरून (डीपी रस्ता), नळस्टॉप, पौड फाटा, विधि महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट मार्ग, विद्यापीठ चौक आणि तेथून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून महामार्गावरून मुंबईकडे असा असणार आहे.
साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना..
साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना तिसरा पर्यायी रस्ता वारजे पूल, कर्वे रस्त्याने आंबेडकर चौक, वनदेवी, कर्वे पूतळा चौक, पौड फाटा, विधि महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट मार्ग, विद्यापीठ चौक आणि तेथून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून महामार्गावरून मुंबईकडे असा असणार आहे