लोणी काळभोर, (पुणे) : दुर्मिळ होत चाललेल्या आपट्याच्या झाडांची पाने, फांद्या तोडून एकमेकांना सोने म्हणून देण्याच्या नादात आपण आपट्याच्या झाडांचा नाश करत आहोत. ही आपट्याची पाने सोने म्हणून देण्याऐवजी आपले आचार, विचार सोन्यासारखे करत दसऱ्याच्या निमित्ताने फक्त शुभेच्छा देण्याचे प्रतिपादन ग्रीन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दसरा सणाचे औचित्य साधून ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने गुरुवारी (ता. ०५) कोळपे वस्ती येथील कॅनल शेजारील वनविभाग परिसरात क्सिजन पाईट क्र ३ आपटा, करंज,वड, पळस आदी देशी व आयुर्वेदिक झाडे लावून दसरा सण साजरा करण्यात आला. यावेळी जगताप बोलत होते.
यावेळी ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, ग्रीन फाउंडेशन हवेली तालुका संपर्क प्रमुख विनोद (बाबासाहेब) यादव, जीवन जाधव, बिरूदेव भास्कर, अभिषेक शेंडगे, राहुल कुंभार, किरण भोसले,अमित कुंभार, किरण बाचकर, सिद्धार्थ खंडागळे,बाबासाहेब घोडके, नानासाहेब देशमुख उपस्थित होते.
यापुढे बोलताना जगताप म्हणाले,” दसऱ्याच्या निमित्ताने फक्त शुभेच्छा देत आपट्याच्या झाडाचे वृक्षारोपण करत त्याचे संवर्धन करत आनंद लुटूला पाहिजे.