पुणे : पुण्यातील ग्रामीण भागात जनावरांना लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आंबेगावच्या तहसिलदार रमा जोशी यांनी बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. याचे आदेशही त्यांनी दिले आहे.
याबाबत बोलताना तहसिलदार रमा जोशी म्हणाल्या कि, बैलगाडा शर्यतीसाठी पुणे जिल्ह्यातील गावागावातुन बैल एकत्र येत असतात. आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे आणि भोरवाडी येथे बैलगाडा घाटात हा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार होता. मात्र, लम्पी स्किन आजाराचे जनावरांमध्ये संक्रमण वाढले आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी बैलगाडा शर्यती बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, गणेशोत्सवा निमित्त आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी येथे ४ सप्टेंबरपासून पुढील आदेश येईपर्यंत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करू नये. १० किलोमीटर परिसरातील बाधित व निगराणी घोषित जनावरांची खरेदी, विक्री, वाहतुक, बाजार, जत्रा, प्रदर्शन बैलांच्या शर्यती आयोजित करू नये. तसेच पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंध असणार आहेत. असे प्रशासनाच्या दिलेल्या आदेशात म्हटले आहे.