Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BREAKING NEWS : यशवंत साखर कारखाना अवसायक प्रक्रियेतून पडला बाहेर ; पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाने रिट याचिका काढली निकाली

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 July 2026, 19:14

पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, कारखाना अवसायक (लिक्विडेशन) प्रक्रियेतून बाहेर आल्याची महत्त्वाची माहिती मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या सभासदांनी दाखल केलेली रिट याचिका न्यायालयाने निकाली काढली आहे.

विकास सदाशिव लवांडे व इतर यांनी ही रिट याचिका दाखल केली होती. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य व इतर हे प्रतिवादी होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या दिवाणी अपीलीय अधिकारक्षेत्रात न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. योगेश पांडे यांनी बाजू मांडली. प्रतिवादी क्रमांक ६ असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखाना लिमिटेडतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अतुल दामले यांच्यासह अॅड. प्रसाद आव्हाड आणि अॅड. चेतन नागरे यांनी काम पाहिले. राज्य शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. आसिफ पटेल यांच्यासह सहायक सरकारी वकील सौ. एम. पी. ठाकूर यांनी बाजू मांडली.

सुनावणीदरम्यान अॅड. अतुल दामले यांनी न्यायालयाला सांगितले की, कारखान्याची मालमत्ता विक्री करून सुरक्षित कर्जदारांचे (Secured Creditors) सर्व दावे पूर्णपणे निकाली काढण्यात आले आहेत. त्यामुळे कारखाना आता अवसायक प्रक्रियेतून बाहेर आला आहे. तसेच सर्व आर्थिक देणी आणि जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर काही शिल्लक निधी राहिल्यास तो कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी वापरण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ही माहिती कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक यांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आली होती. न्यायालयाने शपथेवर केलेले हे निवेदन ग्राह्य धरले. या पार्श्वभूमीवर, कारखान्याचे सभासद म्हणून याचिकाकर्त्यांनी मागितलेले दिलासे आता विचाराधीन ठेवण्याचे कोणतेही कारण उरले नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. परिणामी, रिट याचिका क्र. ५२७०/२०२५ निकाली काढण्यात आली.

 

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाला कायदेशीर मान्यता मिळाली असून, भविष्यात कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेला मोठी गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय! उमेदवारांची यादी जाहीर; पुण्यात कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

Friday, 2 October 2026, 23:08

NOCचा सौदा तब्बल 50 लाखांत! PWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जण एसीबीच्या जाळ्यात

Friday, 2 October 2026, 22:23

SIRला मोठी मुदतवाढ! हरकतींसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत संधी; BLO थेट घरी येऊन घेणार कागदपत्रे

Friday, 2 October 2026, 21:14

SIRमधून वगळलेल्यांना मोठा दिलासा! ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पुन्हा नोंदणीची संधी

Friday, 2 October 2026, 20:50

10 लाखांची चोरी अन् थेट परराज्यात धाड! CCTVच्या एका धाग्याने चोरांचा शोध; शिक्रापूर पोलिसांचा बिटरगुंट्यात छापा..

Friday, 2 October 2026, 20:27

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार! ‘पोलीस-ज्येष्ठ नागरिक संवाद’ उपक्रमातून थेट संवाद

Friday, 2 October 2026, 19:59
Next Post

बहिणीने दागिने मागितले अन् उघड झाला लाखोंचा डाव! कपाटातून 1.32 लाखांचे सोनं गायब, कोरेगाव मूळमधील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp