Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बहिणीने दागिने मागितले अन् उघड झाला लाखोंचा डाव! कपाटातून 1.32 लाखांचे सोनं गायब, कोरेगाव मूळमधील घटना

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 18 July 2026, 19:40

उरुळी कांचन : घरात कोणतीही तोडफोड न करता किंवा कपाट न उचकटता कुलूप नसलेल्या कपाटातून अज्ञात चोरट्याने घरातून तब्बल 1 लाख 32 हजार 871 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना 10 जून 2026 ते मंगळवारी (ता. 07 जुलै) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गोळीबार मैदान येथे घडली.

याबाबत नंदा गोपीनाथ बिराजदार (वय-45, रा. गोळीबार मैदान, कोरेगाव मूळ, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदा बिराजदार या मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची विवाहित मुलगी पूजा दत्तात्रय माने ही त्यांच्या शेजारीच एका पत्र्याच्या शेडमध्ये राहते. सुरक्षेच्या कारणास्तव मुलीने आपले सोन्याचे सर्व दागिने आईच्या (नंदा यांच्या) घरातील लाकडी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये विश्वासाने ठेवण्यास दिले होते. या कपाटाला कुलूप नव्हते.

7 जुलै 2026 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नंदा यांची बहीण ललिता बापू कुंजीर ही त्यांच्या घरी आली होती. तिने घालण्यासाठी काही दागिने मागितले असता, नंदा यांनी कपाट उघडून पाहिले. त्यावेळी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. कपाटाला कुलूप नसल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घरात शिरून दागिन्यांवर डल्ला मारल्याचे उघड झाले.

 

दागिने चोरीला गेल्यानंतर नंदा बिराजदार यांनी कुटुंबातील आणि संपर्कातील सर्व लोकांना या दागिन्यांबाबत विचारणा केली. घरातीलच किंवा नात्यातील कोणीतरी हे दागिने घेतले असावेत आणि ते परत मिळतील, या आशेपोटी त्यांनी काही दिवस पोलिसांत जाणे टाळले. मात्र, आठवडा उलटूनही दागिने न मिळाल्याने अखेर त्यांनी उरुळी कांचन पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, अज्ञात चोरट्याने कपाटातून एकूण 1 लाख 32 हजार 871 रुपये किमतीचे (जुन्या खरेदी दरानुसार) सोने लंपास केले आहे. यामध्ये सोन्याचे गंठण, कानातील साखळी व टॉप्स, गोल सोन्याची चैन, सोन्याचे दोन बदाम, सोन्याची अंगठी असा मुद्देमाल चोरून नेला आहे . याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवलदार विकास लगस करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मोसमी पावसाची महाराष्ट्रातून माघार; रब्बी हंगामावर मोठं संकट! शेतकऱ्यांची चिंता वाढली

Sunday, 4 October 2026, 7:23

आजचा रविवार ठरणार लकी! सूर्यदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचं नशीब पालटणार, अचानक धनलाभाचे संकेत

Sunday, 4 October 2026, 7:10

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21
Next Post

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! शिवराज मोटेगावकरच्या RCC क्लासेसमध्ये CBI ची एंट्री; चौकशीने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp