Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 3 October 2026, 21:40

ठाणे : ठाण्यात २९ तारखेच्या रात्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला आता वेगळे वळण मिळाले आहे. मनोरमानगर परिसरातील क्लस्टर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर पूर्णेकर यांनी एका प्रसिद्ध बांधकाम कंपनीविरोधात माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. या कारणावरून त्यांना धमक्या येत असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. आता या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ ने दोन बांधकाम व्यावसायिकांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.

पूर्णेकर राहत असलेल्या मनोरमानगर, शास्त्रीनगर, गणेशनगर आणि चर्च रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर क्लस्टर योजनेअंतर्गत बांधकाम प्रकल्प प्रस्तावित असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे १५० एकर परिसरात तब्बल ११ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असल्याचा दावा करण्यात आला आहे. या परिसरातील काही अनधिकृत बांधकामांविरोधात पूर्णेकर यांनी आवाज उठवला होता. तसेच क्लस्टर प्रकल्प विशिष्ट बांधकाम कंपनीला मिळावा यासाठी प्रयत्न होत असल्याची चर्चा असल्याने त्यासंदर्भातील माहितीही त्यांनी माहितीच्या अधिकारातून मागवली होती.

या पार्श्वभूमीवर पूर्णेकर यांना अनेकदा धमक्या आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. आता त्यांच्या हत्येचा आणि या क्लस्टर प्रकल्पाचा काही संबंध आहे का, या दिशेने तपास यंत्रणा चौकशी करत असल्याचे सांगितले जात आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने एका मोठ्या बिल्डरला आणि एका बांधकाम कंपनीच्या भागीदाराला चौकशीसाठी बोलावले होते. दोघांची बराच वेळ चौकशी करण्यात आली असून, त्यांना सोडण्यात आले आहे. तसेच पुढील चौकशीसाठी पुन्हा हजर राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, या हत्येप्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पूर्णेकर यांच्या हत्येमागे मोठी सुपारी देण्यात आल्याचा आरोप केला आहे. मात्र या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. तसेच क्लस्टर प्रकल्पाशी संबंधित बांधकाम व्यावसायिकांचा हत्येशी प्रत्यक्ष संबंध असल्याचेही अद्याप तपासातून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणातील पुढील चौकशीत नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Sunday, 4 October 2026, 20:40

‘अंधभक्तीचा चरस-गांजा आम्ही उतरवू, मी पंतप्रधान झालो तर…’ पुण्यातल्या आंदोलनात संजय राऊतांचा मिश्किल टोला…

Sunday, 4 October 2026, 20:31

माढा तालुक्यातील ‘तुळशी’ गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव…

Sunday, 4 October 2026, 19:50

पुणे हादरलं! कात्रज-कोंढवा रोडवर तरुणाचा खून; दारुपार्टीत वाद अन् मित्रानेच काढला काटा

Sunday, 4 October 2026, 19:33

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09
Next Post

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या - खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp