Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 3 October 2026, 21:45

आदित्य बोराटे

इंदापूर: पावसाने ओढ दिल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला असून, शेतीच्या नुकसानीने त्यांच्यासमोरील संकट अधिक गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने पंचनाम्यांच्या प्रक्रियेत वेळ न दवडता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, तसेच कर्जमाफी करावी, अशी मागणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (दि. ३) केली.

सुळे यांनी रेडणी व निरवांगी येथे भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यंदा तालुक्यात एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांतील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचे सुळे यांनी सांगितले.

दरम्यान, तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज असलेल्या गावांमध्ये तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा. जनावरांसाठी आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू कराव्यात आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.

 

शेतकऱ्यांसाठी राजकारण बाजूला ठेवू

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण बाजूला ठेवून सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. सरकारने तातडीने बैठक घेऊन दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुढील वर्षभराचे नियोजन करावे, असे आवाहन सुळे यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, अमोल भिसे, सागर मिसाळ, अशोक घोगरे, छायाताई पडसळकर यांच्यासह रेडणी व निमसाखर गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रशासकीय अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04

गुंजवणीच्या सुधारित जल नियोजनास प्रशासकीय मान्यता! भोर-राजगडमधील १,९३०.६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ; तीन उपसा सिंचन योजनांचा मार्ग मोकळा

Saturday, 3 October 2026, 19:24
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp