पुणे – हवेली तालुका भारतीय जनता पक्षाच्या धक्क्याने हवेली तालुक्यात येत्या सोमवार (ता. २९) पासुन ११ गुंठ्यांच्या दस्त नोंदणीस सुरुवात होणार आहेत. अकरा गुठ्यांची दस्त नोंदणी सुरु होणार असल्याने, हवेलीचा अडकलेला आर्थिक गाडा पुन्हा एकदा रुळावर येणार आहे.
हवेली तालुक्यात ११ गुंठ्यांची खरेदीखते सुरु व्हावीत. या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे व त्यांच्याी सहकाऱ्यांनी आज (गुरुवारी) विधानभवनासमोर केलेल्या उपोषनाला यश आले आहे.
हवेली तालुका भारतीय जनता पक्षाच्या विनंतीनुसार बागायत जमिनीकरिता ११ गुंठे व जिरायत जमिनींसाठी २० गुंठे वरील शेतजमिनींच्या खऱेदी-विक्रीची दस्त नोंदणी, नियमांच्याअधीन राहून सरु करणार असल्याची घोषणा पुणे जिल्हा सह जिल्हा निबंधक अनिल पारखे यांनी परीपत्रकाच्या माध्यमातुन केली आहे.
दरम्यान, अनिल पारखे यांनी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करणेबाबत अधिनियम मध्ये नमुद प्रमाणभूत क्षेत्र बागायत जमिनीकरिता ११ गुंठे व जिरायत जमिनींसाठी २० गुंठे वरील शेतजमिनींचे दस्त नोंदणीबाबत दस्तातील खरेदीदाराकडुन शेतकरी असल्याबाबतचा पुरावा घेऊन, दस्त नोंदणी करण्याबाबतचच्या सुचना निबंधक कार्यालयांना देण्यात येणार असल्याचेही पारखे यांनी स्पष्ठ केले आहे.
हवेली तालुक्यात मागिल काही महिन्यापासुन मुद्रांक व नोंदणी विभागाने तुकाडाबंदी व तुकडाजोड कायदा १९४७ नुसार राज्यातील ११ गुंठे जमीनीचा तुकडा पाडून विक्री करण्यास अथवा जमिनीची रजेस्ट्री करण्यावर प्रतिबंध घातला होता. या आदेशावर औरंगाबाद खंडपीठाने मुद्रांक व नोंदणी विभागाचा परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय दिला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतरही पुणे जिल्ह्यात फक्त हवेली तालुक्यातच खरेदीविक्रीची दस्तनोंदणी बंद होती.
या प्रार्श्वभुमिवर हवेलीत ११ गुंठ्यांची खरेदीखते सुरु करण्यासाठी भाजपच्यावतीने पुणे येथील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालायासमोर आमरण उपोषण गुरुवारी दिवसभऱ करण्यात आले. या उपोषनादरम्यान हवेली तालुक्यात दस्त नोंदणी सुरु करण्याबाबत या कार्यालयाचे अधिनस्त सर्व सह दुय्यम निबंधक यांची विशेष बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करणेबाबत अधिनियम मध्ये नमुद प्रमाणभूत क्षेत्र बागायत जमिनीकरिता ११ गुंठे व जिरायत जमिनींसाठी २० गुंठे वरील शेतजमिनींचे दस्त नोंदणीबाबत दस्तातील लिहुण घेणार यांचे शेतकरी असल्याबाबतचे पुरावे घेऊन दस्त नोंदणी करणेबाबत सुचना देण्यात आली आहे.
हवेली तालुक्यात ११ गुंठ्यांची दस्तनोंदणी सुरु करण्यासाठी झालेल्या आंदोलनात जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, धर्मेंद्र खांडरे, दादा सातव पाटील, प्रविण काळभोर, भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष संदिप भोंडवे, भाऊसाहेब शिंदे, प्रदीप सातव, कमलेश काळभोर, अजिंक्य कांचन, नवनाथ काकडे, नितीन काळभोर, आप्पा काळभोर, किरण काळभोर, नवनाथ काळभोर, सरपंच स्वप्नील उंद्रे, विपुल शितोळे, भाऊसाहेब थिटे, विजय जाचक,शरद आव्हाळे, श्रीमंत झुरुंगे, रूपेश शिवले, विशाल गुजर, शशिकांत गायकवाड, संतोष झरांडे, अतुल काळभोर, आबा गायकवाड, शामराव गावडे आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.