पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड (Breaking News) म्हणून ओळख असलेल्या (Bandu Andekar) बंडू आंदेकर (Vanraj Andekar) यांच्यासह त्यांच्या भावजय आणि सुनेला येणारी पुणे (Andekar Gang) महापालिका निवडणूक लढवण्याची परवानगी न्यायालयाकडून मिळाली आहे. आयुष कोमकर हत्याप्रकरणी बंडू आंदेकर आरोपी आहेत. तथापि, निवडणूक लढवण्यावर कोणताही कायदेशीर अडथळा नसल्याचे नमूद करत न्यायालयाने त्यांना हिरवा कंदील दिला आहे. (Pune News)

निवडणूक लढवणं घटनात्मक अधिकार
पुण्याच्या विशेष मकोका न्यायालयात आंदेकर यांनी निवडणूक लढवण्यासाठी परवानगी देण्याची विनंती करत अर्ज दाखल केला होता. हा अर्ज त्यांच्या वतीने मिथुन चव्हाण यांनी सादर केला होता. अर्जाची सुनावणी करताना न्यायालयाने स्पष्ट केले की निवडणूक लढवणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे त्यासाठी स्वतंत्र न्यायालयीन परवानगी घेण्याची गरज नसते. आरोपी असणे किंवा एखाद्या गुन्ह्याचा तपास सुरू असणे हे निवडणूक लढवण्यावर बंदी आणत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
एकाच कुटुंबातले तिघे निवडणुकीच्या रिंगणात
न्यायालयाने दिलेल्या मतानुसार, निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या नियमांनुसार व्यक्तीने उमेदवारी अर्ज भरल्यास आणि आवश्यक कागदपत्रे दिल्यास त्याला निवडणुकीत सहभागी होण्याचा अधिकार आहे. आरोपी असल्यामुळे उमेदवारी नाकारावी असा कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे बंडू आंदेकर, त्यांची भावजय आणि सून तिघेही महापालिका निवडणूक लढवू शकणार आहेत.


स्थानिक राजकारणात खळबळ
या निर्णयामुळे आगामी पुणे मनपा निवडणुकीत आंदेकर परिवार सक्रियपणे मैदानात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. बंडू आंदेकर यांच्या नावावर अनेक गुन्हे दाखल असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता या निर्णयाबद्दल विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तथापि, न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.







