Friday, June 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिंहगडावर सापडला बेपत्ता तरुणीचा मृतदेह ; रॅपलिंगच्या साहाय्याने खोल दरीतून काढला बाहेर

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 1 May 2026, 11:56

विशाल शिंदे

नसरापूर, ता.1 : मागील दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह सिंहगडावर सापडला आहे. रॅपलिंगच्या साहाय्याने खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

मनीषा धर्मदास गायकवाड (वय २८, मूळ रा. धनेगाव, जि. नांदेड; सध्या रा. बिजलीनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

 

मनिषा ही तरुणी दि. २८ एप्रिल २०२६ पासून बेपत्ता होती. तिचा मोबाईल, बॅग व इतर साहित्य सिंहगड परिसरात आढळून आल्याने कुटुंबीयांनी हवेली पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली पोलीस व आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमने दि. २९ एप्रिल रोजी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. मात्र अंधार व प्रतिकूल परिस्थितीमुळे कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. त्यामुळे शोधमोहीम दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली.

दि. ३० एप्रिल रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक उपनिरीक्षक गिरे, प्रवीण ताकवणे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथक सक्रिय होते. सुमारे तासाभराच्या शोधानंतर तोफ खाण्याजवळील बुरुज परिसरात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. तपासादरम्यान तरुणीने बुरुजावरून खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. ही बाब प्रथम कृष्णा मरगळे यांच्या निदर्शनास आली.

यानंतर तानाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा मरगळे, गणेश सपकाळ, संदीप सोळसकर, संजय चोरगे, उत्तम पिसाळ, संतोष भगत, तेलवडे, वैभव भोसले आदींनी पुढील रेस्क्यू मोहीम हाती घेतली. तानाजी भोसले व कृष्णा मरगळे यांनी दोराच्या साहाय्याने रॅपलिंग करत खोल दरीत उतरून मृतदेहापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. या संपूर्ण कारवाईत कृष्णा मरगळे यांनी विशेष धाडस व नेतृत्व दाखवत मोलाची कामगिरी बजावली.

दरम्यान, रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान मृतदेहाजवळ आगी मोहाच्या मधमाशांची सात ते आठ पोळे असल्याचे आढळले. रॅपलिंगदरम्यान हालचाल व दगड घसरल्यामुळे मधमाशा आक्रमक झाल्या आणि कृष्णा मरगळे व तानाजी भोसले यांच्यावर हल्ला चढवला. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी धैर्याने परिस्थिती हाताळत स्ट्रेचर व आवश्यक साहित्य मृतदेहाजवळ ठेवले व तत्काळ स्वतःची सुटका करून सुरक्षित स्थळी पोहोचले.

यानंतर मधमाशा शांत झाल्यावर बॅकअप टीम पाठवून मृतदेह वर आणण्यात आला आणि प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला.

या शोधमोहीमेत वनविभागाचे समाधान पाटील, वायकर साहेब तसेच बळीराम वायकर, संदीप कोळी, कैलास झरांडे, नितीन गोळे, राजू बडदे, रोशन पन्हाळकर यांनी सहकार्य केले. अग्निशमन दलातील प्रेमसागर राठोड, ज्ञानेश्वर बुधवंत, तुषार पवार, प्रवीण देसाई, अमोल यादव, सिद्धांत जाधव, अजय सावंत, ज्ञानेश्वर जाधव यांनीही मोलाची मदत केली.

या घटनेचा पुढील तपास हवेली पोलीस करत असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“पोलिसांचा लाडका आहे का तो?” विलास घुले हत्या प्रकरणात धनंजय मुंडे आक्रमक, खासदार सोनवणेंना थेट सवाल

Friday, 26 June 2026, 20:41

विरोधक झाले सहप्रवासी! उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा एकाच विमानात प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Friday, 26 June 2026, 19:53

केतनला संपवण्यासाठी ‘लोहगड’च का निवडला? सिया अन् चेतनचा जबाबात धक्कादायक खुलासा…

Friday, 26 June 2026, 19:16

समाजसुधारणेचा विचार आजही प्रेरणादायी – प्राचार्य डॉ. विजयकुमार घोडके

Friday, 26 June 2026, 19:08

‘ड्रग्सला नकार, जीवनाला होकार’; विश्रांतवाडी पोलिसांची जनजागृती बाईक रॅली

Friday, 26 June 2026, 18:52

मुळशी वीज तांत्रिक कामगार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब सायकर

Friday, 26 June 2026, 18:43
Next Post

हवेलीत कारचा पाठलाग करून कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.