उरुळी कांचन (पुणे) : स्त्री समाजात चांगल्या गोष्टींचा विचारासाठी एकत्र येत आहे. ही नवभारत निर्मितीची संकल्पना आहे. उरुळी कांचन येथील भाजपा शहर महिला मोर्चाच्या वतीने महिलांसाठी सांस्कृतिक सणांसाठी एकत्र येऊन भव्य स्वरुपात व्यासपीठ निर्माण केले आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सोमेश्वर नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा पुजा प्रदीप कंद यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील भारतीय जनता पार्टी उरुळी कांचन शहर महिला मोर्चा आयोजित भव्य गणपती व गौरी सजावट (देखावा) स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन मणिश्रीकृष्ण सभागृहात करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेमध्ये ३०० पेक्षाजास्त महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी पुजा कंद बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमास अस्मिता महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा महादेव कांचन, शेवाळवाडीच्या माजी सरपंच प्रतिमा राहुल शेवाळे आदीं मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. या बक्षीस सोहळ्याच्या कार्यक्रमात महिलांनी मंगळा गौर कार्यक्रमात फुगडी, फेर या खेळाचा आनंद घेतला. या स्पर्धेत ३०० महिलांनी स्पर्धेत सहभाग घेऊन गौरी गणपतींचा आकर्षक आरास केला होता. स्पर्धेत गौरी आरास सपर्धेत प्रथम क्रमांक चा मान पुष्पा चाबुकस्वार व गणपती आरास स्पर्धेस प्रथम शितल सचिन माळवदकर यांनी फटकाविला. विजेत्या महिलांना पुजाताई कंद यांच्या हस्ते पारीतोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक उरुळी कांचन ग्रामपंचायत सदस्या ऋतुजा कांचन, सिमा जगताप, रूपाली कांचन, सारिका लोणारी, डॉ. सुचिस्मिता वनारसे, पुजा सणस, काजल खोमणे, कविता शरद खेडेकर, रेखा तुपे, सुषमा चव्हाण, साक्षी ढवळे, सायली तुपे, खुशी खुशाल कुंजीर, शालन कांचन यांनी आयोजन केले होते.
यापुढे बोलताना कंद म्हणाल्या,” महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी गौरी-गणपती गृह सजावटसारख्या विविध स्पर्धा व उपक्रम सातत्याने राबविण्याने महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळत आहे. त्यामुळे स्त्री आपल्या आत्मसन्मानासह सामाजिक अधिष्ठान जपत आहे ही देखील अतिशय कौतुकास्पद बाब आहे”
दरम्यान या कार्यक्रमात पुजाताई कंद व ऋतुजा कांचन यांनी मंगळा गौर कार्यक्रमात फुगडीचा जोरदार फेर घेतला. यावेळी उपस्थितांनी त्यांना दाद दिली.