पुणे : राज्यातील शेतकरी महाडीबीटी या शासकीय पोर्टलच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत असतात.विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ‘महाडीबीटी’ या शासकीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या या पोर्टलवर तांत्रिक सुधारणा सुरू असल्यामुळे अर्ज प्रक्रिया काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
प्रत्येक आर्थिक वर्षात महाडीबीटी पोर्टलमध्ये काही सुधारणा केल्या जातात. नवीन 2025-26 आर्थिक वर्षाची सुरुवात १ एप्रिलपासून झाली आहे. नव्या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी पोर्टलमध्ये काही तांत्रिक बदल व अद्यतने केली जात आहेत. याच कारणामुळे सध्या अर्ज प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.कृषी विभागाच्या माहितीनुसार, ही सुधारणा प्रक्रिया 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर पोर्टल पुन्हा कार्यान्वित केले जाणार आहे.
महाडीबीटी पोर्टलवर सध्या कृषी विभागाच्या खालील योजना उपलब्ध आहेत :
कृषी सिंचन योजना
कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
राष्ट्रीय कृषी विकास योजना
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
या वरील सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे..