Big News : नवी दिल्ली : आयटीआर अर्थात प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी वेळोवेळी मुदत देण्यात येते. त्यात आता वैयक्तिक करदात्यांकडून भरल्या जाणाऱ्या वैयक्तिक करदात्यांच्या एकूण उत्पन्नात सुमारे प्राप्तिकर विवरणपत्राच्या (आयटीआर) संख्येत गेल्या नऊ वर्षांत 90 वाढ झाली असून, वर्ष 2021-22 त्यांची संख्या 6.37 कोटींवर आहे.
2021-22 मध्ये याची संख्या 6.37 कोटींवर गेली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 चे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत 31 जुलै 2023 होती. यंदा प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांच्या संख्येत 53 लाखांची भर पडली आहे. करनिर्धारण वर्ष 2013-14 मधील 3.36 कोटींवरून कर निर्धारण वर्ष 2021-22 पर्यंतच्या नऊ वर्षात ही संख्या 6.37 कोटींवर पोहोचली आहे.
वैयक्तिक करदात्यांच्या प्राप्तिकर विवरणपत्राच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच उत्पन्नाच्या विविध श्रेणींमध्ये वैयक्तिक करदात्यांनी भरलेल्या विवरणपत्रात वाढ झाली आहे. यावरून वैयक्तिक करदात्यांचे उत्पन्न वाढत असल्याचे देखील स्पष्ट होत आहे.