पुणे : वाढत्या वीजदरांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या एक एप्रिल पासून पुढील पाच वर्ष स्वस्त दरात वीज मिळणार आहे.
महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता..या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले. या आदेशानुसार महावितरण कंपनीने वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता वीज जर 10 टक्क्यांनी स्वस्त होणार आहे.महत्त्वाचे म्हणजे राज्यात पुढील पाच वर्षे वीज स्वस्त होणार असल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.
दरम्यान वीज स्वस्त झाल्यानं याचा सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. घरगुती वीज वापरकर्त्यांना वीज दर कपातीमुळे दिलासा मिळणार आहे. याचा उद्योग क्षेत्राला देखील फायदा होणार आहे.