दिनेश सोनवणे
दौंड : अष्टविनायक महामार्ग व दौंड तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांना प्रमुख मार्गाला जोडण्यासाठी डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण कामासाठी आमदारांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन घनश्याम देवकाते यांनी केले.
मलठण (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत राजेगाव मार्गावरील थोरात वस्ती रस्त्याच्या डांबरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याचे भूमिपूजन दौंड पंचायत समितीचे माजी सदस्य घनश्याम देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घनश्याम देवकाते बोलत होते.
यावेळी नवनाथ वाघमोडे, गणेश देवकाते, नवनाथ देव मुंडे, बापू येवले, मेजर दिलीप थोरात, बाबुराव वाघमोडे, शहाजी धागाटे, आनंदराव देवकाते, किरण देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना देवकाते म्हणाले, “दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी स्थानिक रस्ते विकास निधीतून वीस लाख रुपये खर्चून ५०० मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे दळणवळणासाठी व शेतमाल वाहतुकीसाठी याचा निश्चितच फायदा होऊन विकासाला गती मिळणार आहे.