Sunday, April 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News : भिगवणच्या पावसाळी समस्यांवर अखेर हालचाल; एनएचएआयकडे ठोस उपाययोजनांची मागणी

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Friday, 24 April 2026, 12:08

Bhigwan भिगवण, ता. 24 : दरवर्षी पावसाळा आला की पाणी साचून नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागणाऱ्या भिगवण (ता. इंदापूर) शहरातील प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत. या गंभीर समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) ठोस उपाययोजनांचे निवेदन सादर केले. या हालचालीमुळे नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. Bhigwan

 

पुणे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य माडगे आणि जिल्हा कोषाध्यक्ष सचिन बोगावत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पाटस टोलनाका येथे एनएचएआयचे मुख्य व्यवस्थापक कणीकुमार यांची भेट घेतली. यावेळी भिगवण शहर आणि परिसरातील पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्यांचा सविस्तर आढावा घेऊन विविध उपाय सुचविण्यात आले. Bhigwan

हॉटेल श्रीशांत ते मदनवाडी चौफुला या मार्गावर सर्व्हिस रोडलगत मोठ्या क्षमतेची ड्रेनेज लाईन उभारण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. भिगवणच्या पश्चिमेकडील डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शहरात येते. हे पाणी योग्य पद्धतीने वाहून नेण्यासाठी सध्याची व्यवस्था अपुरी पडत असून, नव्या ड्रेनेज प्रकल्पामुळे हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो, असे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. Bhigwan

फक्त नवीन ड्रेनेजच नव्हे, तर विद्यमान लाईनमधील पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी मोठ्या चेंबरद्वारे पाण्याचे विभाजन करण्याचीही गरज अधोरेखित करण्यात आली. सध्याच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे पाणी साचून रस्ते जलमय होतात आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. एस.टी. स्थानकासमोरील पुलावरील प्रलंबित स्ट्रीट लाईट पोल बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच हॉटेल श्रीशांत ते दत्तकला स्कूल, चिंचोली या मार्गावर नवीन स्ट्रीट लाईट्स बसविण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. या उपाययोजनांमुळे अपघातांचा धोका कमी होऊन नागरिकांची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे. Bhigwan

या महत्त्वाच्या बैठकीला माजी उपसरपंच प्रदीप वाकसे, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अमोल देवकाते यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने भिगवणच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. मुख्य व्यवस्थापक कणीकुमार यांनी शिष्टमंडळाच्या सर्व मागण्या लक्षपूर्वक ऐकून घेत त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे भिगवणकरांना यंदाच्या पावसाळ्यात दिलासा मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Bhigwan

 

 

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

Crime

Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून ; चार आरोपींना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई..

Sunday, 26 April 2026, 12:42
missing link project

Missing Link Project : मुंबई-पुणे मिसिंग लिंक’चे 1 मे रोजी लोकार्पण ; जगातील सर्वात रुंद बोगदा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार..

Sunday, 26 April 2026, 12:05

Daund News : देउळगाव गाडा येथील मेंढपाळ कुटुंबाचे घर फोडले ; दीड लाखांचे दागिने आणि रोकड लंपास..

Sunday, 26 April 2026, 11:35

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर डिनर पार्टीत गोळीबार! वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेल मध्ये थरार, हल्लेखोराला बेड्या

Sunday, 26 April 2026, 11:09

Pune News : सोशल मीडियावर तलवारीचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणारा ताब्यात ; गुन्हे शाखा यूनिट- 2 ची कारवाई

Sunday, 26 April 2026, 10:45

Mseb News : लोणी कॉर्नर येथे कचऱ्याच्या आगीमुळे डीपी जळाली ; २०० हून अधिक वीजजोडणी ठप्प

Sunday, 26 April 2026, 10:37
Next Post

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथे विद्यार्थ्याचा लॅपटॉपवर चोरट्याने मारला डल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.