Loni Kalbhor लोणी काळभोर, ता. 24 : एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या घरातून लॅपटॉपसह इतर साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील चिंतामणी पार्क परिसरात घ्गाडली असून गुरुवारी (ता.23) सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी अथर्व मोहन म्हात्रे (वय 20, रा. श्रमसाफल्य पी.जी., फ्लॅट क्रमांक 401) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Loni Kalbhor

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्व हा एमआयटी इन्स्टिट्यूटमध्ये बी.टेकच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून, तो आपल्या मित्रांसोबत संबंधित फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहे. 22 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11.45 वाजण्याच्या सुमारास मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अथर्व आपल्या रूममधून बाहेर पडला होता. त्यावेळी त्याने आपला डेल कंपनीचा ‘इन्स्पायर ऑन 15’ मॉडेलचा लॅपटॉप बॅगेत ठेवून हॉलमधील टेबलावर ठेवला होता. Loni Kalbhor
दरम्यान, रूममेट्सना दरवाजा बंद करण्यास सांगून तो मित्राच्या रूमवर गेला. मात्र, दुसऱ्या दिवशी 23 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता परत आल्यानंतर हॉलमधील टेबलावर ठेवलेली लॅपटॉपची बॅग गायब असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. रूममेट्सकडे चौकशी करूनही काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर संपूर्ण फ्लॅटमध्ये शोध घेतला असता बॅग आढळून आली नाही. यामुळे अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरी केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. Loni Kalbhor
या चोरीमध्ये सुमारे 10 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, 500 रुपयांची लेदर बॅग आणि पर्ससह विविध महत्त्वाची कागदपत्रे (डेबिट कार्ड, आरसी, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार व पॅन कार्ड) असा एकूण 10 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Loni Kalbhor







