Saturday, May 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor Crime : भररस्त्यात अडवून तरुणावर कोयत्याने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 April 2026, 13:57
Loni kalbhor

photo- social media

Loni Kalbhor लोणी काळभोर, ता. 24 : लग्न समारंभाला आलेल्या एका तरुणाला अडवून तिघांनी कोयत्याने वार व डोक्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरातील 20 एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. या थरारक हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Loni Kalbhor

सुरेश बाबुराव गायकवाड (वय 18), कुणाल राहुल चौगुले (वय 18) व शुभम धर्मा सोलंकी (वय माहित नाही, सर्व रा. कदमवाकवस्ती,ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आकाश सूर्यकांत पवार (वय 28, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Loni Kalbhor

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश हे ऑनलाईन कुरिअर सेवा देऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. आकाश हे कवडीपाट टोलनाका परिसरातील एका लग्न समारंभाला गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते रात्री सुमारे 10.30 वाजता निघाले. वाटेत दत्त मंदिर येथे दर्शन घेऊन ते दुचाकीवरून घरी परतत होते. त्यांची गाडी लक्ष्मी लॉन्स परिसरात पोहोचताच त्यांच्या मागून राखाडी रंगाच्या, नंबर प्लेट नसलेल्या डिओ दुचाकीवरून तीन जण आले. त्यांनी आकाश यांची गाडी आडवी लावून थांबवले. कोणताही वाद किंवा कारण नसताना आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. Loni Kalbhor

या दरम्यान मुख्य आरोपीने आकाश यांची गच्ची पकडून कोयत्याने पाठीवर वार केला. त्याच वेळी दुसऱ्या आरोपीने कमरेतील धारदार वस्तूने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात आकाश यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तिसऱ्या आरोपीने त्यांच्या डोळ्यांवर बुक्यांनी मारहाण केली, ज्यामुळे ते खाली कोसळले. हल्ल्यानंतरही आरोपींची दहशत थांबली नाही. त्यांनी आकाश यांच्या दुचाकीवर लाथा मारत व कोयत्याने वार करत नुकसान केले आणि घटनास्थळावरून फरार झाले. Loni Kalbhor

जखमी अवस्थेत आकाश यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांना तत्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांनी अधिकृत तक्रार दाखल केली. या प्रकरणी तिन्ही आरोपींच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Loni Kalbhor

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात महागाईची “दुसरी लाट” येणार! आरबीआयचा देशाच्या अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा

Friday, 22 May 2026, 23:01

पुण्यात कौटुंबिक वादातून मुलाचा अजब कारनामा! वडिलांच्या मित्राची रिक्षा चोरून फरार; गुन्हा दाखल

Friday, 22 May 2026, 22:13

नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून मोठी अपडेट! एनटीएची “फिजिक्स” तज्ज्ञ मनीषा हवालदार सीबीआयच्या जाळ्यात

Friday, 22 May 2026, 21:21

कोंढवा, हडपसर जलमय; वाडकर मळ्यातील रस्ते पाण्याखाली! पहिल्याच पावसात पुणे महापालिकेचं “कागदी” नियोजन चव्हाट्यावर

Friday, 22 May 2026, 20:41

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कामशेत बोगद्यात एकाच वेळी दोन मोठे अपघात! निसरड्या रस्त्यामुळे गाड्या घसरल्या; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Friday, 22 May 2026, 20:09

‘सांग माझी बायको कुठे आहे’ पुण्यात दारुपार्टीत दोन मित्रांमध्ये वाद; रागाच्या भरात बियरच्या बाटलीने मित्रावर हल्ला

Friday, 22 May 2026, 19:27
Next Post

RTE Admission Process : पूर्व हवेलीसह पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत महाघोटाळा? बोगस भाडेकराराच्या माध्यमातून श्रीमंतांनी गरीब विद्यार्थ्यांचा हक्क लाटले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.