Saturday, April 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

RTE Admission Process : पूर्व हवेलीसह पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत महाघोटाळा? बोगस भाडेकराराच्या माध्यमातून श्रीमंतांनी गरीब विद्यार्थ्यांचा हक्क लाटले

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 April 2026, 14:56

 RTE Admission Process  पुणे, ता. 24 : शिक्षणाचा हक्क देणाऱ्या आरटीई (Right to Education) कायद्यालाच आता भ्रष्टाचाराचा विळखा पडल्याचे धक्कादायक चित्र पुणे जिल्ह्यात समोर येत आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी खाजगी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागा या प्रत्यक्षात धनदांडग्यांनी बळकावल्याचा गंभीर आरोप होत आहे. यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. RTE Admission Process

 

पूर्व हवेलीसह पुणे जिल्ह्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची चर्चा जोर धरत आहे. बोगस उत्पन्नाचे दाखले, बनावट राहत्या पत्त्यांची कागदपत्रे, खोटे भाडेकरार आणि फसवे दस्तऐवज तयार करून श्रीमंत कुटुंबांनी आपल्या मुलांचे प्रवेश निश्चित केल्याचे उघड होत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, या प्रवेशांसाठी 5 हजारांपासून ते 25 हजार रुपयांपर्यंत ‘देणघेण’ झाल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. RTE Admission Process

या संपूर्ण प्रकरणात शिक्षण विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. नियमांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून, पडताळणी प्रक्रियेत शिथिलता ठेवून आणि आर्थिक फायद्यासाठी चुकीच्या अर्जांना मंजुरी देण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे आरटीईसारख्या संवेदनशील योजनेलाच काळिमा फासला गेला आहे. हा गैरप्रकार केवळ एखाद्या शाळेपुरता किंवा भागापुरता मर्यादित नसून हवेली तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाल्याची चर्चा आहे. अनेक ठिकाणी स्थानिक गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील मुलांनी त्या जागा मिळवल्याचे वास्तव समोर येत आहे. RTE Admission Process

आरटीई ही योजना गरिबांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी राबवण्यात आली. मात्र, भ्रष्टाचारामुळे खऱ्या गरजू विद्यार्थ्यांचा हक्क हिरावला गेला असून, त्यांच्या शिक्षणाच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. पालकांमध्ये तीव्र नाराजी असून, “सरकारच्या योजना फक्त कागदावरच आहेत का?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे. या सर्व घडामोडींमुळे शिक्षण विभागाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. आता विभाग यावर नेमकी कोणती भूमिका घेणार, दोषींवर कारवाई होणार का, की हा प्रकारही दडपला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गरीब विद्यार्थ्यांचा हक्क परत मिळणार का, की भ्रष्टाचारच जिंकणार? हा सवाल सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. RTE Admission Process

आरटीई प्रवेशातील गैरप्रकार आणि घोटाळ्याची मुख्य कारणे: RTE Admission Process 
गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आरटीई योजनेत घडणाऱ्या गैरप्रकारांमागे काही ठळक कारणे समोर येत असून, यामुळे संपूर्ण यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उत्पन्न दाखले, रहिवासी पुरावे आणि इतर आवश्यक कागदपत्रांची काटेकोर तपासणी केली जात नसल्याने बोगस कागदपत्रांना सहज मंजुरी मिळते. काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने पैशांच्या मोबदल्यात अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याचे आरोप होत आहेत. हीच या घोटाळ्याची प्रमुख कडी मानली जात आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असली तरी त्यातील तांत्रिक त्रुटी, डेटा पडताळणीचा अभाव आणि नियंत्रण यंत्रणेची कमतरता यामुळे गैरप्रकारांना वाव मिळत आहे. आरटीईसारखी महत्वाची योजना मूळ उद्देशापासून भरकटत असून, खऱ्या गरजू विद्यार्थ्यांचा हक्क हिरावला जात आहे. आता या सर्व कारणांवर कठोर उपाययोजना न केल्यास हा घोटाळा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. RTE Admission Process

“आरटीईसारखी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठीची महत्त्वाची योजना काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने अक्षरशः पैशांचा बाजार बनली आहे. ज्यांना खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभ मिळायला हवा होता, त्या विद्यार्थ्यांनाच वंचित ठेवून श्रीमंतांना मागच्या दाराने प्रवेश दिला जात आहे, ही अत्यंत लाजिरवाणी आणि संतापजनक बाब आहे,” ही केवळ प्रशासकीय चूक नसून मोठ्या प्रमाणावरचा संघटित घोटाळा आहे. या प्रकारात सहभागी असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा, आम्ही याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यास मागेपुढे पाहणार नाही.”“शिक्षण विभागाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पारदर्शक करावी, तसेच खऱ्या पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा,”
युवराज काकडे (सभापती, पंचायत समिती हवेली)

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सहकार मंत्र्यांचा मोठा निर्णय! भीमा-पाटसच्या प्रशासक नियुक्तीला स्थगिती

Friday, 24 April 2026, 20:39

Pune Solapur Road : केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री, २ राज्यमंत्री, ३ खासदार आणि ५ आमदारांचे राजकीय वजन असतानाही पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीकडे कानाडोळा!”

Friday, 24 April 2026, 18:40
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात जागेअभावी पोलीसच ‘वाऱ्यावर’ ; आरोपींसाठी जेल नाही, कर्मचाऱ्यांना बसायला जागा नाही ; त्रस्त पोलिसांनी धरला बदलीचा रस्ता..

Friday, 24 April 2026, 18:13

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीच्या माजी सरपंचाकडून महिलेला अश्लील शिवीगाळ करून कुटुंबाला दिली मारण्याची धमकी

Friday, 24 April 2026, 17:59

उरुळी कांचनमध्ये ‘रॉंग साईड’ने येणाऱ्या टेम्पोची वृद्धाला पाठीमागून धडक ; उपचारादरम्यान मृत्यू ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 17:20
Pune Crime: Brother-in-law attacked with "cement gattu" after saying he would not send his sister! Brother-in-law and brother-in-law clash over going to visit their in-laws; Both seriously injured

Shikrapur News : तळेगाव ढमढेरे येथे यात्रेच्या फ्लेक्सवरून जगताप आणि घुले गटात तुंबळ हाणामारी ; शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 16:43
Next Post

Pune News : भांबुर्डा येथील राखीव वनक्षेत्रात राडारोडा टाकणारे दोन डंपर जप्त ; अवैध कचरा टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले, वनविभागाची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.