सुरेश घाडगे
परंडा : सोनारी (ता. परंडा) येथील भैरवनाथ शुगर या साखर कारखान्याचा १५ व्या गळीत हंगामाचा रविवार ( दि. ३० ) गव्हाणीत मोळी टाकुन प्रारंभ करण्यात आला. पालकमंत्री सावंत सोडवणार वाढीव दराची कोंडी सोडविणार का याकडे सर्व ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.
भैरवनाथ शुगरने गत गळीत हंगाम २०२१-२२ मधील गाळप केलेल्या ऊसाला वाढीव दर देण्याचा निर्णय घेतला असून आठवड्याभरात कारखान्याचे सर्वेसर्वा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा .डॉ .तानाजीराव सावंत कारखाना स्थळावर पत्रकार परिषद घेवून वाढीव दर जाहिर करणार आहेत. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा . शिवाजीराव सावंत यांनी दिली आहे.
गत गळीत हंगामात ६ लाख ९० हजार मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून चालू गळीत हंगामात ९ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उदीष्ट असल्याचे ही यावेळी चेअरमन प्रा .सावंत यांनी सांगीतले . किती वाढीव दर मिळणार ? व वाढीव दराची कोंडी सुटणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, भैरवनाथ शुगरने वाढीव दर द्यावा अशी मागणी गत महिन्यापासून ऊस उत्पादकातून होत आहे . तसेच माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी वाढीव दराच्या मागणीसाठी ( दि. २७ ) परंडा शहरात मोर्चा काढून परंडा तहसिलदार यांना निवेदन दिले होते .यामुळे मागणीचा जोर वाढला होता .मोळी कार्यक्रमात वाढीव दर जाहिर होईल.अशी अपेक्षा होती. परंतु आठवडाभरात पालकमंत्री डॉ . सावंत पत्रकार परिषद घेवून वाढीव दर जाहिर करणार आहेत . त्यामुळे दर काय मिळणार ? याकडे विरोधकांसह मित्र पक्ष व ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी कार्यकारी संचालक तथा जि.प. माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत , माजी सभापती तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके , गजेंद्र सूर्यवंशी, अॅड .केशव सावंत , पृथ्वीराज सावंत , जनरल मॅनेजर ठोंबरे , जाधव , भोसले , सिरसट , काळे , जयदेव गोफणे, रत्नकांत शिंदे , ज्योतीराम क्षीरसागर, हरिभाऊ खैरे, बालाजी कोलते, कर्ण लांडगे, कल्याण शिंदे ,रमेश बारसकर ,दादा बारसकर, अशोक गायकवाड, बापू जहागीरदार, जगदीश पाटील, नामदेव राठोड, अंगद फडतरे, राम पाटील, औदुंबर गाडे, अमोल नलवडे, आप्पा कारंडे, गणेश खेडकर, सिताराम गोडगे, लक्ष्मण पाटील, सुजित परदेशी ऊस उत्पादक शेतकरी, वाहन मालक, वाहतुकदार, कर्मचारी उपस्थित होते .