उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव (ता. हवेली) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बापूसाहेब बबन चौधरी यांची तर उपाध्यक्षपदी संजय सोमाजी चौधरी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नायगाव येथे झालेल्या ग्रामसभेमध्ये ही निवड करण्यात आली.
मावळते अध्यक्ष सुरेश हगवणे व उपाध्यक्ष शिवाजी चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया नायगाव येथील ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी (ता. 14) सरपंच अश्विनी चौधरी यांच्याअध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत ग्रामसेविका विजया भगत यांनी अध्यक्षपदी चौधरी यांची तर उपाध्यक्षपदी संजय चौधरी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी माजी सरपंच कल्याणी हगवणे, गणेश चौधरी, उपसरपंच दत्तात्रय बारवकर, जितेंद्र चौधरी, संगीता शेलार, पल्लवी गायकवाड, उतम शेलार, बाळासाहेब गायकवाड, प्रियंका गायकवाड, सुरेश हगवणे, कृष्णा चौधरी, शिवाजी चौधरी, माया चौधरी, कल्पना पवार, पोलीस पाटील अर्जुन पवार, रामचंद्र पवार, संतोष हगवणे, पोपट चौधरी, योगेश चौधरी, नितीन हगवणे, रामचंद्र माने, बापू चौधरी, विजय चौधरी, अर्जुन चौधरी, विठ्ठल हगवणे, किरण गुळुंजकर, कैलास चौधरी, भाऊसाहेब चौधरी, नवनाथ गायकवाड, किरण चौधरी, अविनाश चौधरी, युसुफ शेख, शांताराम उरसळ, गोरख चौधरी, नंदू चौधरी, संजय चौधरी, सुनिल हगवणे, पोपट चौधरी, उत्तम घुले, आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणाले, “गावातील तंटे गावातच सर्वांना बरोबर घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.”