दीपक खिलारे
इंदापूर : रोटरी क्लबच्या माध्यमातून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयास बेबी वॉर्मर हा अत्याधुनिक संच शनिवारी (ता. ०३) भेट देण्यात आला आहे.
रोटरी क्लब ऑफ इंदापूर डिस्ट्रिक्ट ३१३१ ममता प्रोजेक्ट अंतर्गत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. डॉ. अनिल परमार यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब आँफ पूना वेस्ट, श्रीमती इंदुमती पी.परमार ऑफ पी. सी. परमार फाउंडेशन पनवेल यांच्या सहकार्याने विविध रुग्णालयात ११० बेबी वॉर्मर देण्यात येणार आहेत.
यातील पहिला बेबी वॉर्मर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयास शनिवारी देण्यात आला आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर सिनर्जी चारू श्रोत्री व ग्लोबल ग्रँड डायरेक्टर संतोष मराठे यांच्या हस्ते आणि रोटरी क्लब आँफ इंदापूरचे अध्यक्ष रो. नरेंद्र गांधी यांच्या उपस्थित याचे लोकार्पण पार पडले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे उपाध्यक्ष आझाद पटेल, सचिव सुनील मोहिते,डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ज्ञानदेव डोंबाळे, माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर, माजी अध्यक्ष उदय शहा, रो. सदस्य धरमचंद लोढा, प्रमोद भंडारी, वरकुटे माजी अध्यक्ष शशिकांत शेंडे, बाळासाहेब क्षिरसागर, इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दीपक चोरमले व रुग्णालयातील कर्मचारी आदी उपस्थित होते.
दरम्यान, या बेबी वॉर्मर संचामुळे कमी वजनाच्या आणि कमी आठवड्यात जन्मलेल्या नवजात शिशूंचे आरोग्य राखण्यासाठी फायदा होणार आहे. रुग्णालयाची गरज ओळखून रोटरीने ग्रामीण भागात आरोग्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल रुग्णालय प्रशासनाने रोटरीचे आभार मानले आहेत.