दिनेश सोनवणे
दौंड : दौंड शहरातील कुरुकुंभ मोरी जवळ एका २५ वर्षीय तरुणाचा धारधार शास्त्राने खून करून आरोपी स्वत: दौंड पोलीस ठाण्यात हजर झाल्याची घटना शनिवारी (ता. ०३) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मयूर चितारे वय – २५, रा. पासलकर वस्ती, ता. दौंड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर अर्जुन स्वामी काळे असे खून करून पोलीस ठाण्यात हजर राहणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड शहरातील कुरुकुंभ मोरी जवळ मयूर चितारे व अर्जुन काळे यांच्यात भांडणे सुरु होती. याच भांडणाच्या रागातून काळे याच्याजवळ असलेल्या धारधार शास्त्राने सोपसाप वार केले. वार करून काळे हा सदर ठिकाणावरून पळून गेला. चितारे हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असता काही नागरिकांनी त्याला जवळच असलेल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता. डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आरोपी हा स्वतः हून दौंड पोलीस ठाण्यात हजर झाला असल्याची माहिती मिळाली आहे.