सागर जगदाळे
भिगवण : समाजाप्रती काहीतरी आपले देणे लागते या हेतूने भिगवण येथील लोकनेते शरदचंद्रजी पवार शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने ऊसतोड कामगारांना थंडी पासून संरक्षण व्हावे याकरिता ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
ऊसतोड कामगार हे दरवर्षी आपले गाव, कुटुंब सोडून इतरत्र उदरनिर्वाह करण्यासाठी जात असतात. कारखान्यासाठी ऊस तोड करत असतात, दिवसभर प्रामाणिक काम करून आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी पैसे शिल्लक राहावेत यासाठी काबाड कष्ट करतात.
या गोरगरीब लोकांचे कष्ट विचारात घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने येथील बी. एड. महाविद्यालयाने या मजुरांना व त्यांच्या कुटुंबियांना 25 ब्लॅंकेटचे वाटप केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजित क्षीरसागर यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांना शाळेत पाठविन्याचे आवाहन केले.
यावेळी प्रा. तुषार क्षीरसागर, डॉ. उज्वला लोणकर,अविनाश गायकवाड, संजय भरणे, अनिता गायकवाड, महेश लांबते, वंदना नारायनकर, शहाजी टेळे, रेश्मा आटोळे, प्रफुल साबळे, विकास आटोळे, तसेच संस्थाचालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.