पुणे : CISCE बोर्डाने 2027 मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. यावर्षी देशभरातून आणि परदेशातून मिळून तब्बल 3,79, 980,विद्यार्थी या परीक्षांना बसणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी वेळेत आणि परीक्षा पद्धतीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

यंदा दहावीच्या परीक्षेच्या वेळेत 45 मिनिटांचा बदल करण्यात आला आहे. आता सकाळी 9.45 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल. सकाळी 10 वाजता प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जाईल आणि 10.15 वाजता प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात होईल.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत विद्यार्थ्यांच्या केवळ पाठांतर क्षमतेवर भर न देता, त्यांच्या संकल्पनात्मक समजाची, चिकित्सक विचारांची आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्याची परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील आव्हानांसाठी तयार करणे हा यामागचा उद्देश असल्याचे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जोसेफ इमॅन्युएल यांनी स्पष्ट केले आहे.

वेळापत्रक आणि महत्त्वाच्या तारखा:

बारावी परीक्षा: 9 फेब्रुवारी ते 8 एप्रिल 2027 या काळात होईल. यासाठी देशातील 1651 शाळांमधून 1,10,026 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ही परीक्षा 1,477 केंद्रांवर घेतली जाईल.
दहावी (ICSE) परीक्षा: 15 फेब्रुवारी ते 31 मार्च 2027 दरम्यान पार पडेल. या परीक्षेसाठी 3,106 शाळांमधून सुमारे ,2,70,000विद्यार्थी 2,835 केंद्रांवर 76 विषयांची परीक्षा देणार आहेत.
महाराष्ट्रातून बारावीसाठी 4,660 आणि दहावीसाठी 31,35 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण 35,695 विद्यार्थी या परीक्षा देतील.विषयानुसार सविस्तर माहितीसाठी बोर्डाच्या अधिकृत (https://cisce.org/) संकेतस्थळाला भेट द्यावी.







