Thursday, November 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अंधश्रद्धेपेक्षा भाविकांच्या जीविताला प्राधान्य! म्हसोबावाडीत यंदापासून पालखी अंगावरून नेण्याची प्रथा बंद; यात्रा कमिटी आणि पोलिस प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 November 2026, 18:38

सागर जगदाळे

भिगवण : अंधश्रद्धा आणि जीवघेण्या रूढी-परंपरांच्या नावाखाली भाविकांच्या जीवाशी खेळ किती दिवस चालणार? श्रद्धा असावी, भक्ती असावी; मात्र त्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य? याच विचारातून इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथील श्री यशवंतराय यात्रेत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली पालखी अंगावरून नेण्याची प्रथा यंदापासून बंद करण्याचा निर्णय यात्रा कमिटी आणि भिगवण पोलीस प्रशासनाने घेतला आहे. धार्मिक परंपरेचा सन्मान राखतानाच भाविकांच्या जीविताची सुरक्षितता सर्वोच्च मानणाऱ्या या निर्णयाची परिसरात चर्चा होत आहे.

म्हसोबावाडी येथील श्री यशवंतराय यात्रेच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 8) सायंकाळी सात वाजता श्री यशवंतराय मंदिरासमोर भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा कमिटी आणि म्हसोबावाडी ग्रामस्थांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पोलिस पाटील तुषार झेंडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष साळुंखे, सरपंच रमेश चांदगुडे, अण्णा चांदगुडे, संदीप चांदगुडे यांच्यासह यात्रा कमिटीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

या बैठकीमध्ये यात्रेतील गर्दीचे नियोजन, भाविकांची सुरक्षितता, धार्मिक कार्यक्रमांची शिस्त आणि संभाव्य अनुचित प्रकार रोखण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः पालखी, ढोल आणि सासनकाठ्या मंदिरात प्रवेश करताना मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जमिनीवर झोपून पालखी अंगावरून नेण्याची प्रथा सुरू असल्याने भाविकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

त्यानुसार यात्रा कमिटी आणि पोलीस प्रशासन यांच्यातील चर्चेनंतर यंदापासून पालखी अंगावरून नेण्याची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे पालखी मंदिरात प्रवेश करताना अंगावरून नेण्याऐवजी सुरक्षित पद्धतीने नेण्यात येणार आहे.या निर्णयामुळे यात्रेच्या काळात संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत होणार असून भाविकांना सुरक्षित वातावरणात दर्शन घेता येणार आहे. विशेष म्हणजे, धार्मिक परंपरेचा सन्मान राखत काळानुरूप आवश्यक बदल स्वीकारण्याची सकारात्मक भूमिका या निर्णयातून दिसून येत आहे. यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनीही भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयाला सहमती दर्शवली आहे.

श्रद्धा ही माणसाला जगण्याचे बळ देणारी असावी, जीव धोक्यात घालण्याचे कारण नव्हे! परंपरा जपताना विवेकाची साथ आणि सुरक्षिततेचे भान ठेवणे हीच काळाची गरज असल्याचा संदेश म्हसोबावाडीच्या या निर्णयातून पुढे आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अंधश्रद्धेपेक्षा भाविकांच्या जीविताला प्राधान्य! म्हसोबावाडीत यंदापासून पालखी अंगावरून नेण्याची प्रथा बंद; यात्रा कमिटी आणि पोलिस प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Thursday, 12 November 2026, 18:38

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! परीक्षेची वेळ बदलली, 45 मिनिटांचा मोठा बदल; जाणून घ्या नवी वेळ

Thursday, 12 November 2026, 18:30

१०वी पास तरुणांसाठी थेट रेल्वेत सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी! रेल्वेमध्ये ४,६५१ पदांची भरती; वाचा सविस्तर…

Thursday, 12 November 2026, 18:24

८व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; बेसिक पगार थेट ६९,००० रुपयांवर पोहोचणार? वाचा सविस्तर…

Thursday, 12 November 2026, 18:22

लोणी काळभोर येथील जगदंबा हॉटेलमधील वादाला नवे वळण; ताटात हात धुतल्याने मारहाण केल्याचा माजी सरपंच राहुल काळभोर यांचा आरोप, हॉटेल मालकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Thursday, 12 November 2026, 17:55

केंद्रीय कर्मचाऱ्यांना १.८ लाखांपर्यंतचे लॅपटॉप खरेदीची परवानगी; चार वर्षांनंतर वैयक्तिक वापरासाठी ठेवता येणार

Thursday, 12 November 2026, 17:51
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp