Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केंद्रीय कर्मचाऱ्यांना १.८ लाखांपर्यंतचे लॅपटॉप खरेदीची परवानगी; चार वर्षांनंतर वैयक्तिक वापरासाठी ठेवता येणार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 12 November 2026, 17:51

मुंबई : केंद्र सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमधील अधिकाऱ्यांना आता १ लाख ८० हजार रुपयांपर्यंतचे लॅपटॉप, टॅबलेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करता येणार आहेत. विशेष म्हणजे, सलग चार वर्षे वापर केल्यानंतर ही उपकरणे अधिकारी वैयक्तिक वापरासाठी कायमस्वरूपी स्वतःकडे ठेवू शकणार आहेत. वित्त मंत्रालयाने १० नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

जुन्या नियमांमध्ये बदल करून इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीची मर्यादा ५० हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. नव्या नियमानुसार, लॅपटॉप, टॅबलेट, नोटबुक आणि अल्ट्राबुक खरेदीसाठीची मर्यादा आता १ लाख ५० हजार रुपये करण्यात आली आहे.

मात्र, ज्या उपकरणांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक भाग किंवा तंत्रज्ञान ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार केलेले असेल, अशा उपकरणांसाठी खरेदीची मर्यादा १ लाख ८० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

या खरेदी मर्यादेमध्ये उपकरणासोबत आवश्यक असलेल्या ‘स्टँडर्ड सॉफ्टवेअर’च्या खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लॅपटॉप किंवा टॅबलेट खरेदी करताना त्यासोबतच्या संबंधित सॉफ्टवेअरचा खर्चही निर्धारित मर्यादेतच करावा लागणार आहे.

नव्या नियमातील आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे, सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सलग चार वर्षे वापरल्यानंतर संबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरण वैयक्तिक वापरासाठी कायमस्वरूपी स्वतःकडे ठेवता येणार आहे. त्यामुळे सरकारी कामासाठी खरेदी केलेल्या उपकरणांच्या वापरासंदर्भात अधिक स्पष्टता आली आहे.

या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमधील अधिकाऱ्यांना आधुनिक डिजिटल उपकरणे वापरण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार झालेल्या उपकरणांच्या खरेदीलाही प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे.

 

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25

मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या! तक्रार प्राप्त होताच प्रशासनाचा मोठा निर्णय; थेट कारवाईचे आदेश!

Thursday, 12 November 2026, 22:05

उरुळी कांचन-आष्टापूर रस्त्यावर उभ्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक ; उरुळी कांचन जवळील तरुणाचा जागीच मृत्यू..

Thursday, 12 November 2026, 21:51

तलाठ्यासह स्वतःसाठी मागितली लाच; 7/12 च्या नोंदीसाठी 20 हजारांचा सौदा, महिला अधिकारी ACBच्या ताब्यात!

Thursday, 12 November 2026, 20:33

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी घातले लक्ष, सर्वच पक्षीय मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Thursday, 12 November 2026, 20:22
Next Post

लोणी काळभोर येथील जगदंबा हॉटेलमधील वादाला नवे वळण; ताटात हात धुतल्याने मारहाण केल्याचा माजी सरपंच राहुल काळभोर यांचा आरोप, हॉटेल मालकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp